Ads of Betting Sites: सट्टेबाजीच्या जाहिराती दाखवल्यास होऊ शकते कारवाई; केंद्राचा OTT आणि डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मला सल्ला
सरकारच्या सल्ल्याचे पालन न केल्यास लागू कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे त्यात म्हटले आहे.
भारत सरकार सट्टेबाजीच्या जाहिरातींवर कठोर भूमिका घेत आहे. केंद्राने नवीन वेबसाइट्स, OTT प्लॅटफॉर्म, न्यूज वेबसाइट्स आणि खाजगी उपग्रह टीव्ही चॅनेलना बेटिंग साइट्सच्या जाहिराती प्रसारित न करण्यास सांगितले आहे. या संदर्भात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (I&B) एक सूचना जारी केली आहे. मंत्रालयाने नेटफ्लिक्स, हॉटस्टार आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ तसेच खाजगी उपग्रह टीव्ही चॅनेल सारख्या ओव्हर-द-टॉप (OTT) प्लॅटफॉर्मवर सट्टेबाजीच्या जाहिराती दाखवण्याविरुद्ध ही कठोर सूचना जारी केली आहे. सरकारच्या सल्ल्याचे पालन न केल्यास लागू कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे त्यात म्हटले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)