अभिनेता Shah Rukh Khan ने विकत घेतले संजय लीला भन्साळी यांच्या 'या' सुपरहिट चित्रपटाचे हक्क; Locarno Film Festival मध्ये केली घोषणा
भविष्यात अशीच प्रसिद्ध व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळेल असे त्याला कधीच वाटले नव्हते. त्यानंतर त्याला देवदास चित्रपटामध्ये ही भूमिका मिळाली.
Shah Rukh Khan Acquired Devdas Films Rights: नुकतेच शाहरुख खानचा स्वित्झर्लंडमध्ये गौरव करण्यात आला. यावेळी त्याने आपल्या आईच्या आवडत्या चित्रपटाचे हक्क विकत घेतल्याचा खुलासा केला. शाहरुख खानने सांगितले की, त्याने दिलीप कुमारचा 'देवदास' हा चित्रपट त्याच्या आई-वडिलांसोबत पाहिला होता. भविष्यात अशीच प्रसिद्ध व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळेल असे त्याला कधीच वाटले नव्हते. त्यानंतर त्याला देवदास चित्रपटामध्ये ही भूमिका मिळाली. यानंतर त्याने सांगितले की, त्याच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटने संजय लीला भन्साळी यांच्या 2002 मध्ये आलेल्या, 'देवदास'चे हक्क विकत घेतले आहेत. या चित्रपटात त्याच्यासोबत ऐश्वर्या राय बच्चन, माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ होते. देवदास हा त्यावेळी भारतात बनवलेला हा सर्वात महागडा चित्रपट होता. स्वित्झर्लंडमधील 77 व्या लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये शाहरुख खानचा 2002 चा, संजय लीला भन्साळी दिग्दर्शित देवदास हा हिट चित्रपट दाखवला जात आहे. (हेही वाचा: कोट्यवधींच्या कर्जात बुडाला अभिनेता Rajpal yadav, बॅंकेकडून मालमत्ता जप्त)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)