Amitabh Bachchan यांच्यासोबत 'झुंड' चित्रपटात काम करणारा अभिनेता Priyanshu Kshatriya ला चोरीप्रकरणी अटक

प्रियांशूवर दागिने आणि लाखांची चोरी केल्याचा आरोप आहे. मात्र बातमीवर विश्वास ठेवायचा झाल्यास पोलिसांनी ही वसुली केली आहे.

Jhund Actor Priyanshu Kshatriya Arrested (Photo Credit - Youtube)

Jhund Actor Priyanshu Kshatriya Arrested: चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत 'झुंड' (Jhund) या चित्रपटात काम करणारा 18 वर्षीय अभिनेता प्रियांशू क्षत्रिय (Priyanshu Kshatriya) याला नागपूर शहर पोलिसांनी (Nagpur Police) चोरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. प्रियांशूवर दागिने आणि लाखांची चोरी केल्याचा आरोप आहे. मात्र बातमीवर विश्वास ठेवायचा झाल्यास पोलिसांनी ही वसुली केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानकापूर परिसरात राहणारे दीप मांडवे (वय 64) यांनी त्यांच्या घरातून पाच लाख रुपयांचे दागिने आणि रोकड चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मंगळवारी प्रियांशूला अटक करण्यात आली. (हे देखील वाचा: Deepika-Ranveer New House: रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणच्या मुंबईतील नवीन घराचा व्हिडिओ व्हायरल; 'इतकी' आहे किंमत)

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now