'बचपन का प्यार' फेम सहदेव दिरदोचा मंगळवारी सायंकाळी अपघात झाला. स्कूटीवर ट्रिपल सीट जाणे त्याला महागात पडले. या अपघातात सहदेवच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. छत्तीसगडच्या सुकमा जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर सहदेवला चांगल्या उपचारासाठी जगदलपूरला रेफर करण्यात आले. एसपी सुनील शर्मा आणि जिल्हाधिकारी विनीत नंदनवार हे जखमी सहदेवला पाहण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पोहचले होते. मंगळवारी सायंकाळी सहदेव मित्रांसोबत स्कूटीवरून प्रवास करीत होता. त्यावेळी अचानक रस्त्यावरील वाळूमुळे वाहन उलटले व अपघात झाला. उपस्थित लोकांच्या मदतीने सहदेवला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.
Chhattisgarh | Sahdev Dirdo is being shifted to Medical College in Jagdalpur for better treatment.
— ANI (@ANI) December 28, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)