Nakhrewali Movie: आनंद एल राय यांच्या 'नखरेवाली' या चित्रपटाची घोषणा, दोन नव्या चेहऱ्यांना संधी
नखरेवाली या चित्रपटात अभिनेता अंश दुग्गल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री प्रगती श्रीवास्तव ही देखील या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे.
'राजना', 'तनु वेड्स मनू' सारखे अनेक हिट सिनेमे देणारे प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माते आनंद एल राय यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. आनंद एल राय यांनी नुकतीच त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. ज्याचे नाव आहे 'नखरेवाली'. या चित्रपटातून आनंद एल राय दोन नव्या चेहऱ्यांना बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार आहेत. नखरेवाली या चित्रपटात अभिनेता अंश दुग्गल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री प्रगती श्रीवास्तव ही देखील या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)