अभिनेता संकेत कोर्लेकरचा आयफोन बाईकस्वारांनी रिक्षातून हिसकावला; ठाण्यात Viviana Mall समोरील प्रकार (Watch Video)

आपला पोलिसांवर विश्वास आहे पण ठाण्यामध्ये सुरू असलेला हा प्रकार चिंतेत टाकणारा आहे त्यामुळे लोकांनी काळजी घेण्याचं आवाहन त्याने केलं आहे.

Sanket Korlekar | instgaram

अभिनेता संकेत कोर्लेकर ने ठाण्यात विवियाना मॉल समोर त्यांच्यासोबत घडलेल्या धक्कादायक प्रकाराची माहिती इंस्टाग्रामवर दिली आहे. संकेतचा सुमारे 1.70 लाखांचा आयफोन 16 चोरांनी लंपास केला आहे. रिक्षामध्ये बसला असताना बाजूने बाईकस्वारांनी येऊन फोन हिसकावल्याचं त्याने सांगितलं आहे. दरम्यान पोलिस स्टेशन मध्ये त्याच्यानंतर पाच मिनिटांत अशीच मोबाईल चोरीची अजून एक तक्रार आल्याचं संकेतने व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. आपला पोलिसांवर विश्वास आहे पण ठाण्यामध्ये सुरू असलेला हा प्रकार चिंतेत टाकणारा आहे त्यामुळे लोकांनी काळजी घेण्याचं आवाहन त्याने केलं आहे. अभिनेत्री अक्षया नाईक ने देखील संकेतच्या पोस्ट खाली कमेंट करत तिच्या कुटुंबातील व्यक्तीसोबतही ठाण्यात काही वर्षांपूर्वी असा प्रकार घडल्याचं सांगितलं आहे.

संकेत कोर्लेकर सोबत काय घडलं? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanket Avinash Korlekar (@korlekarmania)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement