AAP MP Raghav Chadha होणार्‍या पत्नी Parineeti Chopra सोबत पोहचले उज्जैन च्या महाकाल मंदिरात; तासभर घेतला पूजेत सहभाग (Watch Video)

श्रावणात भाविक आवर्जुन शिव शंकराचं दर्शन घेतात. त्यानुसार पारंपारिक वेषात परिणीती आणि राघवही महाकाल मंदिरात पोहचले होते.

Raghav Parineeti | Twitter

काही महिन्यापूर्वी साखरपुडा झालेले आप खासदार राघव चढ्ढा यांनी आज त्यांच्या होणार्‍या पत्नी परिणिती चोपडा सोबत उज्जैन च्या महाकाल मंदिरात पूजा अर्चना केली. यावेळी राघव सोवळ्यात होते. तर परिणितीनेही साडी परिधान केली होती. दरम्यान मीडीया रिपोर्ट्सनुसार हे जोडपं सप्टेंबर महिन्यात विवाहबद्ध होणार आहे. तत्पूर्वी त्यांनी हिंदू धर्मीयांसाठी पवित्र असलेल्या श्रावण महिन्यात शिवशंकराचं देशातील एक प्रमुख मंदिर असलेल्या महाकाल मंदिरात दर्शन घेतलं आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement