Tata Nexon CNG लवकरच होणार लॉन्च, टेस्टिंग दरम्यान फोटो लीक

अलीकडेच Tata Nexon CNG देशात चाचणी दरम्यान दिसली आहे. हे नवीन मॉडेल 1.2-लिटर रेव्होट्रॉन टर्बो पेट्रोल इंजिन आणि दोन गिअरबॉक्स पर्यायांसह 6-स्पीड मॅन्युअल आणि AMT येण्याची शक्यता आहे.

Tata Nexon CNG लवकरच होणार लॉन्च, टेस्टिंग दरम्यान फोटो लीक
Photo Credit - Twitter

सीएनजी वाहनांच्या वाढत्या मागणीमुळे, मारुती सुझुकी (Maruti Suzuki) तसेच टाटा मोटर्स (Tata Motors ), ह्युंदाई (Hyundai ), किया (Kia ) आणि टोयोटा (Toyota ) सारख्या कार निर्मात्या कंपन्या त्यांच्या सीएनजी श्रेणीचा विस्तार करण्याचा विचार करत आहेत. अलीकडेच Tata Nexon CNG देशात चाचणी दरम्यान दिसली आहे. हे नवीन मॉडेल 1.2-लिटर रेव्होट्रॉन टर्बो पेट्रोल इंजिन आणि दोन गिअरबॉक्स पर्यायांसह 6-स्पीड मॅन्युअल आणि AMT येण्याची शक्यता आहे. 120 bhp आणि 170 Nm आउटपुट करणार्‍या नियमित गॅसोलीन युनिटच्या तुलनेत, SUV च्या CNG प्रकारात 15 bhp कमी पॉवर मिळण्याची शक्यता आहे. मात्र ही कार जास्त मायलेज देऊ शकते. सीएनजी किटमधून बूट स्पेसमध्ये काही प्रमाणात कपात होण्याची शक्यता आहे. Tata Nexon CNG प्रकारात इतर कोणतेही बदल पाहायला मिळणार नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jayesh Koli (@trakin_wheel)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 18, 2022 08:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).