Tata Nano Will Be Re-launched: पुन्हा एकदा लॉन्च होणार स्वस्त कार टाटा नॅनो; संक्षिप्त डिझाइन, मात्र फीचर्स केले अपग्रेड, जाणून घ्या काय असू शकते किंमत
नॅनो कार आता आधुनिक सुधारणांसह रस्त्यावर धावणार आहे.
Tata Nano Will Be Re-launched: जेव्हापासून भारतात कारची मागणी वाढली आहे, तेव्हापासून किफायतशीर आणि इंधन-कार्यक्षम कार खरेदीदारांची संख्याही वाढली आहे. टाटाने 2008 मध्ये आपली टाटा नॅनो लाँच केली, तेव्हा तिच्याकडे एक परवडणारी कार म्हणून पाहिले गेले होते. रतन टाटा यांनी भारतातील उदयोन्मुख मध्यमवर्गासाठी क्रांतिकारी कार म्हणून नॅनो लाँच केली होती. परंतु लोकांनी तिला अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद दिला नाही. आता अहवालानुसार, उद्योगपती रतन टाटा यांच्या सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेली टाटा नॅनो पुन्हा एकदा बाजारात येणार आहे. नॅनो कार आता आधुनिक सुधारणांसह रस्त्यावर धावणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधारित नॅनो शहरी प्रवाशांसाठी त्याचे संक्षिप्त डिझाइन कायम ठेवेल, परंतु ग्राहकांच्या वाढत्या पसंतींची पूर्तता करण्यासाठी त्यामध्ये लक्षणीय सुधारणा केल्या जातील, तसेच काही फीचर्स अपग्रेड केले जातील. अहवालानुसार याची किंमत 2.5 लाखांपासून सुरू होऊ शकते. (हेही वाचा: Electric Vehicles Rise: 2025 पर्यंत जगभरात 85 दशलक्ष ईव्ही वाहने रस्त्यावर धावणार; भारतात ईव्ही वाहनांची संख्या 5 लाखांवर जाण्याची शक्यता - रिपोर्ट)
पुन्हा एकदा लॉन्च होणार स्वस्त कार टाटा नॅनो-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)