Sexual Activity Data: धक्कादायक! Nissan, Kia सारख्या गाड्या प्राप्त करू शकतात चालकाच्या Sex Life ची माहिती- Reports
फायरफॉक्स वेब ब्राउझर मोझिला (Mozilla) च्या निर्मात्यानुसार, ग्राहकांनी त्यांचे फोन्स वाहनांना कनेक्ट केल्यानंतर बहुतेक ऑटोमेकर्स ड्रायव्हर्सबद्दल वैयक्तिक माहिती मिळविण्यासाठी विविध स्त्रोत तपासू शकतात.
आजकाल कार्समध्ये थक्क करणारे तंत्रज्ञान वापरले जात आहे. ग्राहकांना आरामदायी प्रवासासह इतरही सोयी-सुविधा पुरवण्यात कार उत्पादक कंपन्यांमध्ये चुरस पाहायला मिळते. आधुनिक कार्समधील टेक्नोलॉजी इतकी प्रगत आहे की, या गाड्या तुमच्या अगदी सेल फोनवरून रिमोट-स्टार्ट केल्या जाऊ शकतात. मात्र अशा कार्समध्ये जे तंत्रज्ञान वापरले जात आहे त्याद्वारे चालकाबाबतची बरीच गोपनीय माहिती कंपन्यांना मिळू शकते. याबाबत एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. ऑटोमेकर्स निसान आणि किआ त्यांच्या ड्रायव्हर्सच्या ‘लैंगिक क्रियाकलाप’ आणि ‘सेक्स लाइफ’वरील डेटा गोळा करू शकतात आणि तो थर्ड पार्टीला विकू शकतात, असे एका नवीन अहवालात म्हटले आहे.
फायरफॉक्स वेब ब्राउझर मोझिला (Mozilla) च्या निर्मात्यानुसार, ग्राहकांनी त्यांचे फोन्स वाहनांना कनेक्ट केल्यानंतर बहुतेक ऑटोमेकर्स ड्रायव्हर्सबद्दल वैयक्तिक माहिती मिळविण्यासाठी विविध स्त्रोत तपासू शकतात. संशोधकांनी सांगितले की, कंपन्या तुमच्याबद्दलची अत्यंत गोपनीय माहितीही मिळवू शकतात. तुमची वैयक्तिक माहिती, वैद्यकीय माहिती, तुमची अनुवांशिक माहिती, तुमच्या लैंगिक जीवन, तुम्ही किती वेगाने गाडी चालवता, तुम्ही कुठे गाडी चालवता आणि तुम्ही तुमच्या कारमध्ये कोणती गाणी वाजता. अशा प्रकारचा डेटा कंपन्या गोळा करू शकतात. (हेही वाचा: World's First Flex-Fuel Car: नितीन गडकरींनी लॉन्च केली जगातील पहिली फ्लेक्स-इंधन कार Innova HyCross; इथेनॉल आणि इलेक्ट्रिक एनर्जीवर चालणार, जाणून घ्या सविस्तर)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)