New Thar Launch: बहुप्रतीक्षित महिंद्रा Thar Roxx 5-door SUV स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भारतीय बाजारपेठेत लाँच, पहा झलक (Video)
थार रॉक्स पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल.
भारतातील थारप्रेमींसाठी एक मोठी बातमी आहे. महिंद्राने आपली बहुप्रतिक्षित थार रॉक्स (पाच-दरवाज्यांची आवृत्ती)- Thar Roxx 5-door SUV भारतीय बाजारपेठेत स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला लाँच केली आहे. या कारची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती आणि ही 2024 मधील सर्वात महत्त्वाच्या कार लॉन्चपैकी एक आहे. थार रॉक्स पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल. थार रॉक्सची सुरुवातीची किंमत 12.99 लाख रुपये (पेट्रोल) आणि 13.99 लाख रुपये (डिझेल) ठेवण्यात आली आहे. ही गाडी 2 ट्रान्समिशन पर्यायांसह 2 प्रकारांमध्ये उपलब्ध आहे- स्वयंचलित आणि मॅन्युअल. थार रॉक्स 3 रंगांमध्ये उपलब्ध आहे.
नवीन थार रॉक्समध्ये, तुम्हाला 10.25-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस ऍपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी, पूर्णपणे डिजिटल कलर इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, हवेशीर फ्रंट सीट्स, पॅनोरॅमिक सनरूफ, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रीअर एसी व्हेंट्स आणि ड्युअल-टोन अपहोल्स्ट्री मिळेल. (हेही वाचा; Maruti Suzuki Recalls 2,555 Alto K10: मारुती सुझुकीने परत मागवल्या 2,555 अल्टो के 10 गाड्या; जाणून घ्या कारण)
पहा व्हिडिओ-