Kinetic Green ने भारतीय बाजारात लाँच केली Zulu Electric Scooter; जाणून घ्या किंमत आणि खास वैशिष्ट्ये
या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड ताशी 60 किमी आहे.
Kinetic Green Zulu Electric Scooter: पुण्यातील Kinetic Green ने भारतात नवीन झुलू इलेक्ट्रिक स्कूटर (Zulu Electric Scooter) लॉन्च केली आहे. ज्याची किंमत 95,000 रुपये (एक्स-शोरूम) आहे. ईव्ही निर्मात्याने म्हटले आहे की, इलेक्ट्रिक स्कूटर पूर्णपणे भारतात तयार केली जाईल. कायनेटिक ग्रीन झुलू इलेक्ट्रिक स्कूटरला ऍप्रॉन-माउंट एलईडी हेडलॅम्प मिळतो. (वाचा - Maruti Suzuki to Hike Prices: नवीन वर्षात कार खरेदी करणाऱ्यांना झटका; जानेवारीपासून मारुती सुझुकीच्या गाड्या होणार महाग)
झुलू इलेक्ट्रिक स्कूटर वैशिष्ट्य -
- कायनेटिक ग्रीन झुलूची लांबी 1,830 मिमी, रुंदी 715 मिमी आणि उंची 1,135 मिमी आहे.
- त्याचा व्हीलबेस 1,360 मिमी आणि ग्राउंड क्लिअरन्स 160 मिमी आहे.
- इलेक्ट्रिक स्कूटरचे वजन 93 किलोग्रॅम असून ती 150 किलोपर्यंत वजन उचलू शकते.
- झुलू स्कूटरमध्ये 2.27 kWh लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे.
- EV निर्मात्याचा दावा आहे की झुलू इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर सुमारे 104 किलोमीटर प्रवास करू शकते.
- या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड ताशी 60 किमी आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)