Anant Ambani-Radhika Merchant Wedding: जुग जुग जिओ! नवविवाहीत जोडपे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांना अमूलकडून खास शुभेच्छा
अमूल इंडियाने नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. अमूल इंडियाने नवविवाहित जोडप्याचे म्हणजेच अनंत आणि राधिका यांचे कार्टून बनवले आहे. त्यावर 'जुग जुग जिओ' असे लिहिले आहे.
Anant Ambani-Radhika Merchant Wedding: अनंत अंबानी(Anant Ambani) आणि राधिका मर्चंट(Radhika Merchant)यांच्या लग्नसोहळ्यात जगभरातील मान्यवर उपस्थित राहिले होते. त्यांच्या लग्नसोहळ्याने नवा ट्रेडमार्क निर्माण केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये, अमूल इंडियाने नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. अमूल इंडियाने नवविवाहित जोडप्याचे म्हणजेच अनंत आणि राधिका यांचे कार्टून बनवले आहे. ज्यात ते दोघे अमूल बटर आणि ब्रेडच्या स्लाइसचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे. ते कार्टून त्यांनी त्यांच्या सोशल मिडीयावर शेअर केले आहे. शिवाय, त्यावर "जुग जुग जिओ" असा संदेश लिहिला आहे. (हेही वाचा:Hardik Pandya-Ananya Panday Dance Video: अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नात हार्दिक पंड्यासोबत थिरकली अनन्या पांडे, पाहा व्हिडिओ)
पोस्ट पहा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)