#YouTubeDOWN झाल्यानंतर सोशल मीडियात मीम्स व्हायरल !

मात्र दोन तासांनंतर तांत्रिक अडचण सोडत सेवा पूर्ववत करण्यात आली.

युट्युब मीम्स (Photo Credit : Twitter)

लोकप्रिय व्हिडिओ शेअरींग वेबसाईट युट्युब बुधवारी सकाळी जगभरात डाऊन झाली. युट्युब सुमारे दोन तास ठप्प होते. युट्युब सुरु केल्यानंतर internal error 500 असा मेसेज येत होता. मात्र दोन तासांनंतर तांत्रिक अडचण सोडत सेवा पूर्ववत करण्यात आली. पण युट्युब ठप्प असताना मजेदार मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

युट्युब बंद असताना युजर्सने ट्विटरवर युट्यूब एररचे स्क्रीनशॉट टाकले. युजर्सला झालेल्या या त्रासाबद्दल जगभरातील युट्युबने माफी मागितली आणि त्यावर तोडगा काढण्याची ग्वाही दिली. अखेर युट्युब सेवा पूर्ववत करण्यात आली. पण या काळात युजर्सने #YouTubeDOWN हा हॅटशॅग वापरून मीम्स पोस्ट केले. YouTube बंद झाल्याने इंटरनेटविश्वात खळबळ; युजर्स वैतागले, कंपनीने काय सांगितले पाहा

हे मीम्स सोशल मीडियावर भलतेच व्हायरल झाले.