UPI Payment For Female Dancer Video: ऐकावं ते नवलचं! पठ्ठ्याने महिला डान्सरला केलं ऑनलाईन पेमेंट; नेटीझन्स म्हणाले, 'अजून किती विकास झाला पाहिजे' (Watch Video)
या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहे. यातील एका यूजरने म्हटलं आहे, 'आता याचे पेमेंटही डिजिटल पद्धतीने होऊ लागले आहे. अजून किती विकास हवा?' सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.
- Read in
- मराठी
UPI Payment For Female Dancer Video: सोशल मीडियावर दररोज नव-नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ खूपचं मजेशीर असतात. सध्या ट्विटरवर @HasnaZaruriHai या यूजरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला डान्सर स्टेजवर डान्स करताना दिसत आहे. तसेच स्टेजच्या खाली एक तरुण तिच्याबरोबर ठेका ठरताना दिसत आहे. यावेळी तो या महिला डान्सला UPI पेमेंट करताना दिसत आहे. महिला या तरुणाला आपले स्कॅनर दाखवते. त्यानंतर हा तरुण या महिलेला ऑनलाईन पैसे पाठवतो. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहे. यातील एका यूजरने म्हटलं आहे, 'आता याचे पेमेंटही डिजिटल पद्धतीने होऊ लागले आहे. अजून किती विकास हवा?' सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.
डान्सर महिला तिच्या नृत्यासाठी आपल्यावर रोख रकमेचा वर्षाव करण्याऐवजी तरुणाला UPI पेमेंटसाठी QR कोड देत आहे. विशेष म्हणजे हा तरुण आनंदाने कोड स्कॅन करताना आणि UPI वापरून तिला पैसे देताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. चलनी नोटांचा वर्षाव करणे किंवा त्यांचा अनादर करणे हा भारतात कायदेशीर गुन्हा आहे.
पहा व्हिडिओ -
आई साला, अब इसका payment भी digitally होने लगा
और कितना विकास चाहिए ?????
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 pic.twitter.com/a0Mw9JwVw4
— HasnaZarooriHai🇮🇳 (@HasnaZaruriHai) March 7, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 07, 2024 04:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

