Man Ate Manchurian In Bengaluru Metro: तरुणाने बेंगळुरू मेट्रोमध्ये खाल्लं 'कोबी मंचुरियन'; पुढे काय झालं? तुम्हीचं पहा व्हिडिओ
त्याचे मित्र त्याला तसे करण्यास मनाई करत होते, पण तो मान्य करत नव्हता. बेंगळुरू मेट्रोने त्याला 500 रुपयांचा दंड ठोठावला आणि जयनगर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
Man Ate Manchurian In Bengaluru Metro: तुम्हाला चालत्या मेट्रोमध्ये काही खाण्याची किंवा पिण्याची सवय असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कदाचित ही बातमी वाचून कोणाचीही पुन्हा मेट्रोत जेवायची हिंमत होणार नाही. बेंगळुरूमध्ये एक तरुण मेट्रोमध्ये गोबी मंचुरियन खात (Man Ate Manchurian In Bengaluru Metro) होता, त्यानंतर त्याच्यासोबत जे घडलं ते आयुष्यभर लक्षात राहण्यासारखं आहे. बेंगळुरू मेट्रोने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मेट्रोमध्ये कोबी मंचुरियन खाताना दिसत आहे. त्याचे मित्र त्याला तसे करण्यास मनाई करत होते, पण तो मान्य करत नव्हता. बेंगळुरू मेट्रोने त्याला 500 रुपयांचा दंड ठोठावला आणि जयनगर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. आता या व्यक्तीला पैसे भरावे लागणार असून खटला लढवावा लागणार आहे. (हेही वाचा - VIDEO: रेल्वे रुळावर उभे राहून रील बनवत होता तरुण; मागून ट्रेनने दिली धडक, पहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ (Watch))
या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. मेट्रोमध्ये वीरता दाखवू नका अन्यथा अशीच कारवाई केली जाईल, असे एका यूजरने लिहिले आहे. एका युजरने म्हटले की, बातम्यांमध्ये राहण्यासाठी कायदा मोडणाऱ्या अशा गोष्टी करू नका. लोलिता नावाच्या युजरने X वर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या व्यक्तीचे नाव सुनील कुमार आहे. तो जयनगर येथील एका दागिन्यांच्या दुकानात काम करतो. मेट्रोमध्ये जेवण केल्याप्रकरणी बेंगळुरू पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आहे. मल्लेश्वरममधील सॅम्पीगे रोड स्टेशनवर हा व्यक्ती दररोज मेट्रोमध्ये चढत असे. आता मेट्रोने त्याला योग्य धडा शिकवला आहे.