बायकोने घातला असा ड्रेस की, चक्क नवऱ्याने साप समजून पायच मोडला!
मात्र नवऱ्याने पाहिल्यावर त्याला तो खरा साप असल्याचे भासल्याने बेसबॉलच्या बॅटने जोरजोरात मारण्यास सुरुवात केली.
दिवसागणिक फॅशनचे वेड सर्वत्र वाढत चालले आहे. काही जण एवढे हटके ड्रेस घालतात की पाहणारे सुद्धा चकीत होऊन जातात. असाच फॅशनेबल पद्धतीचा एक ड्रेस ऑस्ट्रेलियातील मेलबर्न (Melbourne)येथे एका विवाहित महिलेने परिधान केला होता. या महिलेने साप सारखे दिसणारे 'स्टॉकिंग्स' (Stockings) घातले होते. मात्र नवऱ्याने पाहिल्यावर त्याला तो खरा साप असल्याचे भासल्याने बेसबॉलच्या बॅटने जोरजोरात मारण्यास सुरुवात केली. परंतु नवऱ्याला तो साप नसून ड्रेस असल्याचे समजल्यावर आश्चर्यचा धक्काच बसला. पण बायकोचा पायाला गंभीर दुखापत झाली.
रिपोर्टच्या अनुसार बायकोने रात्री झोपताना साप सारखे दिसणारे स्टॉकिंग्स घातले होते. बायोकोचे अर्ध्याहून अंग चादरीने झाकले गेले होते. परंतु फक्त पायाचा भाग चादरीमधून बाहेर दिसत होता. ज्यावेळी नवरा झोपण्यासाठी रुममध्ये आला तेव्हा आंधारमुळे बायकोचा पाय न दिसल्याने फक्त सापासारखे काहीतरी नवऱ्याला दिसले. त्यावेळी नवऱ्याने बेसबॉलची बॅट काढून मारण्यास सुरुवात केली.
परंतु नवऱ्याने बायकोच्या पायावर फटके मारताच ती किंचाळली तेव्हा नवऱ्याला तो साप नसून बायकोचा पाय असल्याचे समजले. त्यानंतर तातडीने नवऱ्याने बायकोला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले.