Victoria Falls Viral Video: 360 फूट उंच व्हिक्टोरिया फॉल्सच्या काठावर झुकलेल्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल

व्हिक्टोरिया फॉल्स हा झांबिया-झिम्बाब्वे (Zambia-Zimbabwe) सीमेवरील जगातील सर्वात मोठ्या धबधब्यांपैकी एक आहे.

Victoria Falls | (Photo Credit - Twitter)

प्रसिद्ध अशा व्हिक्टोरीया फॉल्सच्या ( Victoria Falls Viral Video) कठड्यावर धबधब्याच्या दिशेने स्वत:ला झोकून दिलेल्या एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Woman's Viral Video) झाला आहे. व्हिक्टोरिया फॉल्स हा झांबिया-झिम्बाब्वे (Zambia-Zimbabwe) सीमेवरील जगातील सर्वात मोठ्या धबधब्यांपैकी एक आहे. हा धबधबा साधारण 380 फूट उंच (360 feet tall Victoria Falls आहे. अशा धबधब्यावर पर्यटकाने स्वत:ला झोकून देणे ही एक अत्यंत धाडसी कृतीत मानली जात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ Weird and Terrifying नावाने @weirdterrifying ट्विर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. ट्विटरवर शेअर केल्यापासून हे वृत्त लिहीपर्यंत हा व्हिडिओ आतापर्यंत सुमारे 19 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओसोबत ''आत्ताच कळले की 380 फूट धबधब्याजवळ उभे राहणे ही एक अद्भूत गोष्ट आहे'' (डेव्हिल्स पूल - व्हिक्टोरिया फॉल्स) अशी कॅप्शनही लिहीली आहे. (हेही वाचा, Viral Video: खिडकीला लटकून साफसफाई करणाऱ्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल; युजर्स म्हणाले, आता लक्ष्मीजी येणार)

व्हिडिओ

व्हिडिओ पाहून अनेकांनी भरभरु प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, वाह... खूप सुंदर. दुसऱ्याने या कृतीवर काहीशी शंका उत्पन्न करत म्हटले आहे की, कृपया मला सांगा तिने पायाला काही बांधले आहे का? कारण व्हिडिओत पाय दिसत नाही. आणखी एका युजरने लिहीले आहे, असे जीवघेणे स्टंट करणे बरे नाही. मला तर अशा लोकांची आणि स्टंटचीही फार भीती वाटते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif