दैव बलवत्तर म्हणून बचावली महिला, रोहतक मध्ये चालत्या ट्रेनखाली झोपून केला स्वतःचा बचाव; पहा काळजाचा थरकाप उडवणारा हा व्हिडिओ (Watch Video)

पण अचानक ट्रेन सुरू झाली. ट्रेन सुरू झाल्याचं महिलेच्या लक्षात येताच ती अंग चोरून रेल्वे रूळाच्या मधल्या भागामध्ये एका कुशीवर झोपून राहिली.

woman saved her life by lying down on a railway track | Photo Credits: ANI/ Twitter

देव तारी त्याला कोणी मारी या उक्तीचा जीवंत अनुभव नुकताच एक महिलेने घेतला आहे. हरियाणाच्या (Haryana) रोहतक ( Rohtak) मध्ये चालत्या रेल्वे खाली एक महिला अंग चोरून ट्रॅक (Railway Track) वर झोपली आणि तिने आपला जीव वाचवला आहे. दरम्यान हा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयामध्ये चांगलाच वायरल होत आहे. रेल्वे अपघातांचे अनेक व्हिडीओ समोर आले आहे. रेल्वे प्रशासनाकडून वारंवार रेल्वे रूळ ओलांडणं हा दंडनीय गुन्हा आहे याची घोषणा केली जाते पण काही नागरिक नियम धाब्यावर बसवत वेळ वाचवण्यासाठी शॉर्ट कट निवडता आणि काही जीवघेणे प्रसंग स्वतःवर ओढावून घेतात. Rail Accident: वेगवान एक्सप्रेस ट्रेन खाली बाईकचा क्षणात चक्काचूर झाला; दैव बलवत्तर म्हणून चालक बचावला; पहा काळजाचा ठोका चुकवणारा हा अपघाताचा व्हिडिओ.

ANI ने ट्वीट केलेल्या व्हिडिओमध्ये ही घटना काल (17 फेब्रुवारी) ची हरियाणा मधील रोहतक मधील असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान व्हिडिओ मधील महिला रेल्वे रूळ ओलांडण्याच्या प्रयत्नात होती. कथित स्वरूपात देण्यात आलेल्या माहितीनुसर, ट्रेन सुरूवातीला स्टॅन्डबाय मोड वर होती. ती रेल्वे सिग्नलची वाट पाहत होती. त्या वेळेस या महिलेने ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न केला. पण अचानक ट्रेन सुरू झाली. ट्रेन सुरू झाल्याचं महिलेच्या लक्षात येताच ती अंग चोरून रेल्वे रूळाच्या मधल्या भागामध्ये एका कुशीवर झोपून राहिली. संपूर्ण ट्रेन तिच्या अंगावरून गेली नंतर ती सुखरूप बाहेर पडली.

दरम्यान या काही मिनिटांच्या प्रसंगामध्ये काहीही होऊ शकलं असतं. पण महिलेले दाखवलेल्या प्रसंगावधानाने काही जण तिचं सोशल मीडीयामध्ये कौतुक देखील करत आहेत. तर या वेळी काही बघ्यांची देखील गर्दी पहायला मिळाली.

पहा हा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

मुंबई मध्येही असे थरारक अपघातांचे व्हिडीओ समोर आले आहेत. अनेकदा प्लॅटफॉर्मवरील सुरक्षा रक्षकांनी जीवाची बाजी लावून प्रवाशांना वाचवल्याचे व्हिडीओ ताजे आहेत. पण असे जीवघेणे स्टंट किंवा वेळ वाचवण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडणं जीवावर बेतू शकतं त्यामुळे नसतं धाडस करण्याचा मूर्खपणा टाळा.