Woman Falls Into River While Yoga: नदीवरचा योगा अंगाशी आला, हात निसटला, थेट पाण्यात पडली महिला (Watch Video)

हा प्रयत्न करताना तिने योगासाठी पोझ घेतली आणि तिचा हात सटकला. ज्यामुळे ती थेट नदीच्या पाण्यात कोसळली. अत्यंत जीवघेणा ठरावा असा हा प्रसंग. ज्याच्या व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Woman Yoga | (Photo Credit - Twitter)

महिलांनी योगा (Woman Yoga) करणे वाईट नाही. उलट ते आरोग्याला चांगले. पण, नको तिथे आणि नको त्या पद्धीतीने योगा करणे मात्र नक्कीच वाईट. चुकीच्या ठिकाणी योगा करणे हे किती त्रासदायक आणि अंगाशी येणारे असू शकते, याचा प्रत्यय एका महिलेला आला. ही महिला वाहत्या नदीवर असलेल्या पुलावर योगा (Woman Falls Into River While Yoga) करण्याचा प्रयत्न करत होती. हा प्रयत्न करताना तिने योगासाठी पोझ घेतली आणि तिचा हात सटकला. ज्यामुळे ती थेट नदीच्या पाण्यात कोसळली. अत्यंत जीवघेणा ठरावा असा हा प्रसंग. ज्याच्या व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा फोटो सर्वात आधी चिसा मेरी हिने 2017 मध्ये इंटरनेटवर पोस्ट केला होता. जो आता पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की, नदीच्या पुलावर चिसा योगा करण्याचा प्रयत्न करत असताना ती पाण्यात पडल्याचे दिसत आहे. चिसा मारी नदीवरील लॉगवर ब्रिज पोज देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. खाली पडून ती नदीत वाहून गेल्याचेही दिसत आहे. (हेही वाचा, Viral Video: बॉयफ्रेंडमुळे रस्त्यात साचलेल्या घाण पाण्यात पडली गर्लफ्रेंड, पुढे जे झाले ते पाहून पोट धरून हसाल, व्हिडीओ व्हायरल)

ट्विट

प्रसारमाध्यमांनी सोशल मीडियाच्या आधारे दिलेल्या वृत्तानुसार, पुलावरुन खाली ती साधारण 4 फूट खोल नदीमध्ये पडली आणि जवळपास 30 फूट लांब अंतरावर वाहून गेली. चिसाचा अनुभवही काही प्रसारमाध्यामांनी सांगितला आहे. चिसाने म्हटले की, पाण्यातून बाहेर मी जेव्हा नदीच्या काटावर आली तेव्हा मी स्वत:वरच खूप हसले. इतकी की, आयुष्यात कधी हसले नव्हते. दरम्यान, सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत ट्विटरवर 1 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif