भारतात पुन्हा एकदा होणार Lockdown? लोकमत ने दिलेल्या बातमीवर PIB कडून स्पष्टीकरण
भारतात पुन्हा एकदा लॉकडाऊन (Lockdown in India) होणार अशी बातमी लोकमत या वृत्तसंस्थेने दिल्यानंतर त्यावर PIB ने स्पष्टीकरण देत ही बातमी खोटी आहे असे सांगितले आहे.
देशभरात पुन्हा एकदा कोरोना डोकं वरु काढू लागला आहे. मागील वर्षी 2020 आलेली कोरोनाची लाट 2021 च्या सुरुवातीला आटोक्यात आली होती. मात्र आता हळूहळू पुन्हा एकदा कोरोना हातपाय हलवू लागला आहे. त्यामुळे त्याला वेळीच आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. या परिस्थितीमुळे भारतात पुन्हा एकदा लॉकडाऊन (Lockdown in India) होणार अशी बातमी लोकमत या वृत्तसंस्थेने दिल्यानंतर त्यावर PIB ने स्पष्टीकरण देत ही बातमी खोटी आहे असे सांगितले आहे.
कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी देशभरात पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार अशी बातमी या वृत्तसंस्थेने दिली होती. मात्र ही बातमी चुकीची असल्याचे PIB सांगितले आहे. या बातमीत तथ्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.हेदेखील वाचा- Liquid Medical Oxygen: द्रव वैद्यकीय ऑक्सिजन वाहतुकीसाठी रेल्वेने आखले धोरण; महाराष्ट्र सरकारने केली होती विनंती
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या वृत्तानुसार, भारतात गेल्या 24 तासात 2,61,500 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 1,501 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 1,38,423 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 कोटी 47 लाख 88 हजार 109 वर पोहोचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 1 लाख 77 हजार 150 वर पोहोचली आहे. सद्य घडीला भारतात 18 लाख 1 हजार 316 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 1 कोटी 28 लाख 9 हजार 643 रुग्ण बरे झाले आहेत.
दरम्यान अशा स्थितीत केवळ निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणावर राजकीय सभा घेणे योग्य होणार नाही. ते नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते, असे सांगत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक (West Bengal Assembly Election 2021) प्रचारासाठी आयोजित केलेल्या आपल्या सर्व सभा रद्द केल्या आहेत. राहुल गांधी यांनी ट्विट करुन ही माहिती दिली.