Bangalore च्या Residency Road परिसरात भिंतींवर Gender Equality, महिला सक्षमीकरणाचे संदेश; पहा या ग्रॅफिटीचे फोटो
एका वॉल वर सेक्सुअल अब्युझ म्हणजेच छेडछाडी, विनयभंग सारख्या गुन्हांविरूद्ध आवाज उठवण्यासाठी एक खास जागा ठेवण्यात आली आहे. या ठिकाणी काही कॉलममध्ये त्या माहिती भरू शकतात.
बलात्कार, विनयभंग, छेडछाडीच्या तक्रारी आल्यानंतर अनेकदा मुलींना प्रश्न विचारले जातात इतक्या उशिरा बाहेर का होती? तोकडे कपडे का घातले होते? कोणासोबत होती? पण या स्वतंत्र्य भारतामध्ये मुलांप्रमाणेच मुलींना त्यांच्या मनाप्रमाणे फिरण्याचे, बाहेर पडण्याचे अधिकार आहेत. पण पुरूषप्रधान संस्कृतीचा पगडा असणारा समाजातील काही लोकांना त्याचा विसर पडतो. अनेक जण मुलींनाच बंधनात ठेवतात किंवा त्यांना आरोपीच्या पिंजर्यात उभं ठेवतात. पण बंगलोर मध्ये ही बुरसट विचारसरणी मागे सारून महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि Gender Equality साठी काही भिंती सजलेल्या दिसत आहे.
@manoj_naandi या ट्वीटर अकाऊंटद्वारा पोस्ट करण्यात आलेल्या एका ट्वीट नुसार ही भिंत आणि ग्रॅफिटी Residency Road परिसरात आहे. या ठिकाणी कन्नड आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत महिलांना मोकळं फिरण्याची मुभा देणारे संदेश, काही मेसेज लिहण्यात आले आहेत. यामध्ये ' वॉक अलोन' अर्थात एकटी चालू शकतेस, ''वॉक विदआऊट दुपट्टा'" ओढणी न घेता चलं असे स्त्रियांना निर्भय करणारे मेसेज आहेत. तसेच एका वॉल वर सेक्सुअल अब्युझ म्हणजेच छेडछाडी, विनयभंग सारख्या गुन्हांविरूद्ध आवाज उठवण्यासाठी एक खास जागा ठेवण्यात आली आहे. या ठिकाणी काही कॉलममध्ये त्या माहिती भरू शकतात. दरम्यान हा एक स्तुत्य उपक्रम आहे. Gender Equality Signal: आता दादर परिसरातील ट्रॅफिक सिग्नल आणि साइन बोर्डवर दिसणार महिलेची आकृती; आदित्य ठाकरेंची माहिती.
Manoj Kumar ट्वीट
मुंबईत वांद्रे परिसरात अनेक ठिकाणी भिंतींवर ग्रॅफिटी केलेली पहायला मिळते. पण अनेकांचे डोळे उघडणारी ग्राफिटी आणि मुलींनाही 'आत्मनिर्भर' करणारी ग्राफिटी क्वचितच बघायला मिळत असेल.
सध्या देशभरात महिलांवरील अत्याचाराचे अनेक गुन्हे समोर येत आहेत. दिवसाढवळ्या मुलींवर होणारे बलात्कार, विनयभंगाच्या तक्रारी मन विषिण्ण करणार्या आहेत. पण या विकृतीला ठेचून काढण्यासाठी मुलींनी स्वरक्षणासाठी सज्ज होणं ही काळाची गरज बनली आहे. अत्याचार सहन करण्याऐवजी त्याच्याविरुद्ध वेळीच आवाज उठवल्यास असे गुन्हे करणार्यांच्या मनात कायद्याची भीती निर्माण होण्यास मदत होईल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)