Viral Video: इंडिया गेटसमोर रशियन तरुणीचा भोजपुरी गाण्यावर डान्स, व्हिडिओ व्हायरल
प्राण्यांपासून ते मानवी स्टंट आणि डान्सपर्यंतचे व्हिडिओ दररोज इंटरनेटवर पाहायला मिळतात. विशेषत: डान्स प्रेमी वेगवेगळ्या गाण्यांवर डान्स व्हिडिओ बनवतात आणि शेअर करतात. या व्हिडिओंमध्ये कधी कोणी राजस्थानी गाण्यांवर तर कधी भोजपुरी गाण्यांवर जोमाने नाचताना दिसतात.
Viral Video: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. प्राण्यांपासून ते मानवी स्टंट आणि डान्सपर्यंतचे व्हिडिओ दररोज इंटरनेटवर पाहायला मिळतात. विशेषत: डान्स प्रेमी वेगवेगळ्या गाण्यांवर डान्स व्हिडिओ बनवतात आणि शेअर करतात. या व्हिडिओंमध्ये कधी कोणी राजस्थानी गाण्यांवर तर कधी भोजपुरी गाण्यांवर जोमाने नाचताना दिसतात. दरम्यान, सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक रशियन तरुणी दिल्लीतील इंडिया गेटसमोर भोजपुरी गाण्यांवर जोरदार नाचताना दिसत आहे. या परदेशी तरुणीसोबत एक भारतीय तरुणही जोमाने डान्स करत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ harsh_tivari_dancer नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 5.3 मिलियन पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. यावर लोकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने लिहिले - हे सर्व पाहण्यासाठी मी गहू विकून रिचार्ज झालो, तर दुसऱ्याने लिहिले - काहीही बोला भाऊ, डान्स खूप छान झाला आहे.