Viral Video: विमानात महिलेच्या गळ्यात पट्टा घालून व्यक्ती घेऊन जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल
प्रतिकात्मक फोटो Photo Credits : Pixabay

Viral Video: काही लोक आपल्याकडे एखाद्याने पहावे या दृष्टीकोनाने असे काही करतात जे कल्पनेच्या पलीकडे असते. याच गोष्टी सोशल मीडियात तुफान व्हायरल होतात. तर अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात खुप व्हायरल होत असून त्यामध्ये एका महिलेच्या गळ्यात पट्टा घालून तिला एक व्यक्ती घेऊन जात असल्याचे दिसून येत आहे.(Baba Vanga 2022 Predictions: बाबा वंगा यांच्या 2022 साठीच्या जगाला हादरवून टाकणाऱ्या भविष्यवाण्या; होणार नवीन विषाणूचा उद्रेक, येणार अनेक नैसर्गिक आपत्त्या)

व्हिडिओत असे दिसत आहे की, विमानात एका महिलेच्या गळ्यात पट्टा घातला आहे. त्याचा दोर तिच्या पुढे चालत असलेल्या व्यक्तीच्या हातात आहे. महिलेला एखाद्या पाळीव प्राण्याप्रमाणे व्यक्ती आपल्यासोबत घेऊन जात आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर युजर्सकडून विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.(Sex on Boys Trip: 'बॉईज ट्रीप'वर गेलेल्या बॉयफ्रेंडच्या फोटोत दिसला Condom; जोडीदार फसवत असल्याचे लक्षात येताच महिलेने उचलले टोकाचे पाऊल)

न्यूजवीक मध्ये छापून आलेल्या बातमीनुसार Reddit वर ही पोस्ट व्हायरल झाली आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ हा विमानातच बसलेल्या एका व्यक्तीने शूट केल्याचे कळते. परंतु कोणत्या विमानातील हा व्हिडिओ आहे हे स्पष्ट झालेले नाही.