Viral Video: बहेडी रेल्वे स्थानकाजवळ एका महिलेने रेल्वेसमोर उभं राहून रील काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बहेडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, महिला रेल्वे ट्रॅकवर उभी होती आणि ट्रेन तिच्या दिशेने वेगाने जात असताना व्हिडिओ बनवत होती. ट्रेन चालकाने लगेच ब्रेक लावला आणि ट्रेन थांबवण्यात यश आले. यावेळी ट्रेनमधील प्रवाशांनी खाली उतरून महिलेला रुळावरून हटवून तिचा जीव वाचवला. घटनेनंतर रेल्वे अधिकारी आणि स्थानिक पोलिसांना माहिती देण्यात आली. ही महिला सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी हे धोकादायक पाऊल उचलत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेवर रेल्वे अधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून हा गंभीर निष्काळजीपणा असल्याचे म्हटले आहे.
येथे पाहा व्हिडीओ:
सर्वसामान्य जनतेने रेल्वे रुळांवर असे धोकादायक काम करणे टाळावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. यामुळे तुमचा जीव तर धोक्यात येतोच पण इतर प्रवाशांची सुरक्षाही धोक्यात येते. रेल्वे पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत असून महिलेवर योग्य ती कारवाई करण्याची तयारी करत आहेत. सोशल मीडियावर रील्स बनवण्याची क्रेझ झपाट्याने वाढत आहे, परंतु अशी धोकादायक पावले कधी कधी जीवघेणे ठरतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की लोकांनी सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने केला पाहिजे आणि त्यांच्या आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या ॲक्टिव्हिटी टाळल्या पाहिजेत.