Viral: नेमकी ही कुठली फॅशन? 42 फूट नखं वाढवतं महिलेचा विश्व विक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
त्यानंतर डायनानं नखं कापलेली नाहीत आणि आता सुरु आहे 2022 म्हणजे सलग 25 वर्ष नखं न कापत या महिलेने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे.
महिला कायमचं आपल्या केसांबाबत किंवा नखांबाबत विशेष काळजी घेताना दिसतात. केस वाढवून वेगवेगळ्या हेअर स्टाईल (Hair Style) साकरणं हे बऱ्याच महिलांना आवडतं. तसेच नखं वाढवत त्यावर रंगीबेरंगी नेलपेंट्स (Nailpaint) लावणे, नेल आर्ट (Nil Art) किंवा नेल पिअर्सिंग सारख्या विविध फॅशन (Fashion) महिला करताना दिसतात. पण या महिलेने तिच्या नखांबाबतीत असं काही केलं की तिची नोंद चक्क गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness World Record) करण्यात आली. अमेरिकेच्या (America) मिनेसोटा येथील डायना आर्मस्ट्राँग (Diana Armstrong) नावाच्या महिलेने तिच्या नावी नवा विश्वविक्रम (World Record) नोंदवला आहे.
डायना आर्मस्ट्राँग मागील 25 वर्षांपासून हातांची नखं कापलेली नाहीत. तर आता तिच्या नखांची लांबी 42 फूट असुन तिने जगातील (World) सर्वात लांब नखं असलेली महिला म्हणून स्वतच्या नावावर विश्वविक्रम नोंदवला आहे. डायनाने 1997 साली शेवटी नखं कापली होती. त्यानंतर डायनानं नखं कापलेली नाहीत आणि आता सुरु आहे 2022 म्हणजे सलग 25 वर्ष नखं न कापत या महिलेने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. (हे ही वाचा:- Viral Video: फणस तोडण्यासाठी हत्तीच्या माकड उड्या! सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल)
पण नखं न कापत विश्व विक्रम करणं यासाठी या महिलेनं नखं नाही कापले असं नाही आहे. डायना आर्मस्ट्राँगने (Diana Armstrong) मुलीची आठवण म्हणून नखं वाढवण्यास सुरुवात केली. डायनाची मुलगी डायनाची नखं कापून त्यांना नेलपेंट लावायची. पण २५ वर्षापूर्वी डायनाच्या मुलीचा मृत्यू झाला आणि मृत्यूपूर्वी देखील आदल्या दिवशीही तिने डायनाच्या नखांना नेलपेंट लावली होती. यामुळे डायनाने दिवंगत मुलीच्या आठवणीत आजपर्यत नखं कापली नाहीत.