Coronavirus: भाजप नेते सोशल मीडियावर ट्रोल, अनेकांनी पोस्टच केल्या डिलीट; विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती
दुसऱ्या बाजुला महाराष्ट्र सायबर पोलिसांनी अनेक युजर्सवर तशी कारवाईही केली आहे.
कोरोना व्हायरस (Coronavirus), लॉकडाऊन (Lockdown) आणि राज्यातील विविध प्रश्नांवर महाराष्ट्र सरकारला सूचना, सल्ले देणाऱ्या आणि टीका करणाऱ्या भाजप (BJP) नेत्यांना सोशल मीडियावर लोकांनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून चांगलेच झोडपले आहे. इतके की युजर्सच्या प्रतिक्रिया पाहून काही भाजप नेत्यांनी आपल्या फेसबुक पोस्ट (Facebook Post) डिलीट केल्या आहेत. काहींनी कमेंट बॉक्स बंद केला आहे. सोशल मीडिया (Social Media) युजर्सच्या नाराजीचा सर्वाधिक फटका हा भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawde), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), सुधिर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आदी नेत्यांना बसला आहे.
विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे यांना अनेक युजर्सनी तीव्र शब्दांत सुनावले आहे. युजर्सनी या नेत्यांच्या आगोदरच्या प्रतिक्रीया, ते सत्तेत असताना त्यांनी केलेले विधाने यांचा आधार घेत ट्रोल केले आहे. विनोद तावडे यांना ''सल्ले द्यायचे सोडा आगोदर तुमचे तिकीट का कापले ते सांगा'', असे एका युजर्सने म्हटले आहे. दुसऱ्या एका युजर्सने चंद्रकांत पाटील यांना ट्रोल करताना ''कोल्हापूर मधून पळाले कोथरुडला स्थिरावले. तिथे चांगले काम करा नाहीतर कोथरुड सोडून पळावे लागेल'' असे म्हटले आहे. (हेही वाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवे लावण्याच्या आवाहनावर सोशल मीडियात युजर्सकडून मिम्सचा पाऊस)
विनोद तावडे यांच्या पोस्टवरील प्रतिक्रिया पाहण्यासाठी पोस्टवर क्लिक करा
चंद्रकांत पाटील यांच्या पोस्टवरील प्रतिक्रिया पाहण्यासाठी पोस्टवर क्लिक करा
चंद्रशेखर बावनकुळे यांना एका युजरने म्हटले आहे की, ''अप्रतिम लिहता तुम्ही माझ्या आयुष्यात पूर्वी खूप नैराश्य होते, नंतर मी आपली पोस्ट वाचली..माझ जीवन सुखी झाल नंतर मी ही पोस्ट माझ्या काही मूळव्याधग्रस्त ,मूतखड्याचे त्रास असलेल्या मित्रांना दाखवली त्यांचेही त्रास दूर झालेत..ही पोस्ट वाचल्यापासून गावच्या म्हशीही गाभण रहायला लागल्यात.. ही पोस्ट शेअर केल्यामुळं सरपंचाला पोरगा झालाय..सगळे गावकरी खूप खूश आहेत.. धन्यवाद''.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पोस्टवरील प्रतिक्रिया पाहण्यासाठी पोस्टवर क्लिक करा
दरम्यान, सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर, सामाजिक सलोखा धोक्यात येईल, कोरोना व्हायरस अथवा इतर कोणत्याही गोष्टीबाबत दिशाभूल करणारी, चुकीची माहिती प्रसारित करणारी माहिती, पोस्ट शेअर केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा स्पष्ट इशारा महाराष्ट्र पोलिस आणि सरकारने दिला आहे. दुसऱ्या बाजुला महाराष्ट्र सायबर पोलिसांनी अनेक युजर्सवर तशी कारवाईही केली आहे.