गवत खाणारा सिंह पाहिला आहे का? पाहा व्हिडिओ
परंतु सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये एक सिंह चक्क गवत (Grass) खाताना आपल्याला दिसत आहे. हा व्हिडिओ गुजरात (Gujrat) येथील गिर जंगलामधील (Gir Forest) आहे. हा व्हिडिओ अनेक लोकांनी पाहिला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) केला जात आहे. जे काही लोक हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांना त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसेना. मासाहारी सिंह कशामुळे शाकाहरी झाला, सगळ्यांना हा एकच प्रश्न पडला आहे.
आपण अनेकदा डिस्कव्हरी चॅनेलवर पाहतो की, सिंह (Lion) त्याचे पोट भरण्यासाठी इतर प्राण्यांची शिकार करतो. परंतु सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये एक सिंह चक्क गवत (Grass) खाताना आपल्याला दिसत आहे. हा व्हिडिओ गुजरात (Gujrat) येथील गिर जंगलामधील (Gir Forest) आहे. हा व्हिडिओ अनेक लोकांनी पाहिला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) केला जात आहे. जे काही लोक हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांना त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसेना. मासाहारी सिंह कशामुळे शाकाहरी झाला, सर्वांना हा एकच प्रश्न पडला आहे.
गिर जंगलात सिंहाच्या संख्येत वाढ झाली आहे. यामुळे त्यांना शिकार शोधायला अडचण निर्माण होत आहे. सिंह गवत खाण्यामागचे हेच कारण असावे, अशी प्रतिक्रिया अनेक लोकांनी दिली आहे. परंतु वन विभागाने (Forest Department) दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओमधील सिंह वृद्ध असल्याने त्याची पचनक्रियेची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे व्हिडिओमधील सिंह गवत खात आहे. एखादा पचन न झालेला पदार्थ बाहेर काढण्यासाठी प्राणी गवत खातात. घास खाल्ल्याने प्राण्यांना उलटी होते. त्यामुळे त्यांना बरे वाटू लागते. या व्हिडिओमध्येही अशाच प्रकार घडत आहे. हे देखील वाचा-गर्लफ्रेंडसोबत टिक-टॉक व्हिडिओ बनवणे पडले महागात, मग वाचा पुढे काय घडले?
सोशल मिडियावर हा व्हिडिओ पाहून प्रत्येकजण सिंहाला गवत घाताना पाहून विचारात पडले आहेत. माहितीनुसार, संपूर्ण आशियामध्ये (Asia) गिर जंगलात सिंहाचे प्रमाण अधिक आहे. या ठिकाणी रस्त्यावरुन चालतानाही सिंह पाहायला मिळतात.