Viral Video: लहान मुलाचा व्हिडिओ पाहून अनेकांना आठवले शालेय जीवन, तुम्हीही असे कधी वागला आहात का?

हा व्हिडिओ पाहून अनेकांना आपल्या शालेय जीवनातील बालपणाची आठवण आली आहे. अनेकांनी तर हा व्हिडिओ भलताच मजेशीर असल्याचे म्हटले आहे.

| (Photo Credit - Twitter)

शाळेत जाणाऱ्या एका लहान मुलाचा एक व्हिडिओ (Viral Videos) सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आपल्या शालेय जीवनातील बालपणाची आठवण आली आहे. अनेकांनी तर हा व्हिडिओ भलताच मजेशीर असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडिओ एका शाळेत जाणाऱ्या मुलाचा आहे. हा चिमुकला मुलगा आहे की मुलगी हे कळू शकले नाही. मात्र, त्याला शाळेत जायला फारच कंटाळा असल्याचे व्हिडिओतून स्पष्ट जाणवते.

व्हिडिओत पाहायला मिळते की, या मुलाला त्याची आई शाळेत सोडण्यासाठी निघाली आहे. शाळेत जायचा भलताच कंटाळा असल्याने हा मुलगा इतका चिडतो की, तो थेट दप्तरच फेकून देतो. तो केवळ दप्तर फेकूनच थांबत नाही तर चक्क ते दप्तर पायानेह लाथाडूनही लावतो. हे पाऊन त्याच्या आईला इतका राग येतो की, चिडलेली आई थेट त्याच्या पाठीत एक धपाटा घालते. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. (हेही वाचा, Cycle Stunt Viral Video: मुलीने उंच टेकडीवरून सायकलसह मारली उडी; व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा)

'ट्विट'

आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आतापर्यंत अनेकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. काहींनी शेअरही केला आहे. एका युजरने प्रतिक्रिया दिली आहे की, अशी मुले पुढे जाऊन काहीच करत नाहीत. दुसऱ्याने म्हटले आहे की, अशा मुलांमुळे बालपण आठवते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif