उत्तर प्रदेशच्या प्रतापगड मध्ये Dolphin ची काठी, कुर्‍हाडी ने मारून अमानुष हत्या; Viral Video नंतर 3 जण अटकेत

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रतापगड (Pratapgarh) मध्ये 4-5 जणांच्या समुहाने काठी, कुर्‍हाडीच्या मदतीने एका डॉल्फिनवर (Dolphin) सपासप वार केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

Dolphin beaten To Death In UP | Photo Credits: Twitter/MaulshreeSeth

माणसामधील विकृतीचं दर्शन घडवणारा अजून एक व्हिडिओ समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रतापगड (Pratapgarh) मध्ये 4-5 जणांच्या समुहाने काठी, कुर्‍हाडीच्या मदतीने एका डॉल्फिनवर (Dolphin) सपासप वार केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये डॉल्फिन मृत पावला आहे. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडीयात वायरल झाल्यानंतर वन विभागाने देखील त्याची दखल घेतली आहे. या प्रकरणी 3 जणांना अटक झाल्याची माहिती TOI ने दिली आहे.

हिवाळ्याचं दिवसांत समुद्र किनारी, पाण्यात डोल्फिन दिसण्याचं प्रमाण अधिक असतं. पाण्यात अशाच एका डॉल्फिनला पाहून ठार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मीडीया रिपोर्ट्स नुसार ही घटना डिसेंबर 2020 महिन्यातील आहे. नंतर सोशल मीडियामध्येही त्याचे विडिओ वायरल झाले आहेत. वन विभागाने 31 डिसेंबर दिवशी या प्रकरणी मारहाण करणार्‍या गावकर्‍यांविरूद्ध FIR दाखल करण्यात आली. नक्की वाचा:  मुंबई: घोडबंदर रोड जवळील जंगलात आढळला 5 फूट लांब डॉल्फिनचा मृतदेह, सोशल मीडियावर फोटो व्हायरल.

काही महिन्यांपूर्वी केरळ मध्ये एका गर्भार हत्तीणीची काहींनी हत्या केली होती. मलप्पुरममध्ये फटक्यांनी भरलेले अननस खाल्ल्याने हत्तीणीची प्रकृती बिघडली आणि तिचा मृत्यू झाला होता. माणूसकीला काळीमा फासणार्‍या या घटनेने सारेच हादरले होते. अनेकांनी सोशल मीडीयात याबाबत तीव्र संताप व्यक्त केला होता. Pregnant Elephant Dies Update: पलक्कड मध्ये गर्भवती हत्तीणीच्या मृत्यू प्रकरणी एकाला अटक, वनमंत्री के राजू यांनी दिली माहिती.

जून 2020 मधील या घटनेमध्ये हत्तीणी सह तिच्या गर्भातील बाळाचादेखील  मृत्यू झाला होता.  या घटनेबाबत वन्यजीव संरक्षण कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत अज्ञात लोकांविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आले होते.