उत्तर प्रदेश: सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करायला आलेल्या पोलिसांना बघून तरुणींनी गच्चीवरून मारली उडी; जागीच मृत्यू
रविवारी, 9 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा पोलिसांच्या पथकानं सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. मात्र याहीपेक्षा धक्कादायक म्हणजे या रेड मधून पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका तरुणीचा मृत्यू झाला आहे
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) वाराणसी (Varanasi) परिसरातून सेक्स रॅकेटचा (Sex Racket) पर्दाफाश करण्यात आला आहे. रविवारी, 9 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा पोलिसांच्या पथकानं सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. मात्र याहीपेक्षा धक्कादायक म्हणजे या रेड मधून पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. झालं असं की, वाराणसीच्या संजयनगर कॉलनी मध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली . त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला पकडले याच वेळी पोलिसांनी पकडण्याच्या भीतीने सेक्स रॅकेटमधील तीन तरुनींनी छतावरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र उंची जास्त असल्याने एका तरुणीचा यात जागीच मृत्यू झाला आहे तर अन्य दोन तरुणी या गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. या जखमी तरुणींना सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मालदीव मध्ये बिकिनी बॅन? अंगप्रदर्शन करण्याचा आरोप करत तरुणीला हिंसकरित्या अटक; व्हिडीओ झाला व्हायरल
प्राप्त माहितीनुसार, पप्पू सिंह नामक इसमाच्या घरात हे सेक्स रॅकेट सुरु होते. काही दिवसांपासून हे घर तीन मुलं आणि दोन मुलींनी भाड्यांने घेतले होते.अलीकडेच घराखाली एक गाडी पार्क करण्यावरून या सर्वांचा स्थानिकांशी वाद झाला होता यावेळी त्यांच्यावर संशय येऊन स्थानिकांनी पोलिसांना याविषयी माहिती दिली. पोलिसांनी धाड टाकताच हा प्रकार उघडकीस आला. यावेळी घराची तपासणी केली असता, त्यांना या तरुणींचे पास्पोर्ट्स सापडले त्यावरून या मुली विदेशी असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या सेक्स रॅकेटशी संबंधित तीन मुलांना अटक करून त्यांच्या तीन बाईक, कार, टेम्पो हे सर्व पोलिसांनी जप्त केले आहे, यामध्ये मृत्यू झालेल्या तरुणीचे पोस्टमार्टम करण्यात येणार आहे तर या प्रकरणात सविस्तर तपास सुरू आहे.