USB In Penis: लिंगात अडकली यूएसबी केबल; लांबी मोजण्याचा अघोरी प्रकार अंगाशी

लिंगाची लांबी मोजण्याचा अघोरी प्रकार एका मुलाच्या चांगलाच अंगाशी आला. यूएसबी केबल त्याच्या लिंगात (USB Cable Stuck in Penis) अडकली. इंग्लंडमध्ये राहणारा हा मुलगा केवळ 15 वर्षांचा आहे. लिंगाची लांबी मोजण्यासाठी त्याने त्याच्या कल्पनेतला मार्ग अवलंबला पण त्यात तो पुरता फसला.

USB In Penis | (Photo Credits: Archived, Edited, Symbolic Images)

लिंगाची लांबी मोजण्याचा अघोरी प्रकार एका मुलाच्या चांगलाच अंगाशी आला. यूएसबी केबल त्याच्या लिंगात (USB Cable Stuck in Penis) अडकली. इंग्लंडमध्ये राहणारा हा मुलगा केवळ 15 वर्षांचा आहे. लिंगाची लांबी मोजण्यासाठी त्याने त्याच्या कल्पनेतला मार्ग अवलंबला पण त्यात तो पुरता फसला. यूएसबी केबल (USB Cable) त्याच्या लिंगात अडकली. त्याने जशी कल्पना केली होती तसे काही घडलेच नाही. उलट नाहक मनस्ताप आणि शारीरिक त्रास उद्भवला. त्याला रुग्णालयात जाऊन डॉक्टरांकरवी उपचार करुन घ्यावे लागले.

डॉक्टरांनी उपचारापूर्वी विचारले तेव्हा या मुलाने आपण यूएसबी केबलचा वापर लिंगाची लांबी मोजण्यासाठी केला. परंतू, तो अंगाशी आल्याचे कबूल केले. त्याचे उत्तर ऐकून डॉक्टरही काहीसे आश्चर्यचकीत झाले. लिंगाची लांबी मोजण्यासाठी त्याने लिंगाच्या पुढच्या होलमधून यूएसबी केबल आत सरकवली. प्राथमिक त्रास होताच त्याने ती बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतू, त्याच्या लक्षात आले की काहीतरी चुकले आहे. केबल बाहेर येत नाही आणि ती आत अडकली आहे. (हेही वाचा, Sex Addiction: लैंगिक व्यसन म्हणजे काय? तुम्हालाही आहे सेक्स अॅडिक्शन? जाणून घ्या लक्षणे)

आपण पुरते अडकलो आहोत. यातून कोणाचीतरी मदत घेतल्याशिवाय सुटका शक्य नाही. हे लक्षात येताच या मुलाने कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली. कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी या घटनेचा निपटारा केल्यानंतर सायन्स डायरेक्टमध्ये एक लेख प्रकाशित करण्यात आला आहे.

डॉक्टरांच्या हावाल्याने प्रकाशित करण्यात आलेल्या लेखात म्हटले आहे की, मुलाने मूत्रमार्गातून यूएसबी केबल आत तर सरकवले. परंतू, केबलचे एक टोक मूत्रमार्गातून बाहेर पडले. दुसरा भाग मात्र मूत्राशयाच्या आतच अडकून राहिला. डॉक्टरांनी अहवालात म्हटले आहे. रुग्ण एक निरोगी किशोरवयीन होता. त्याचा कोणताही मानसिक आरोग्य विकारांचा कोणताही इतिहास नव्हता.

मूत्राशय अडकलेली यूएसबी बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांना एक शस्त्रक्रिया करावी लागली. डॉक्टरांनी छोटीशी शस्त्रक्रिया करुन आतला आणि बाहेरचा तुकडा वेगळा केला. तसेच लिंगात अडकलेली वायरही अलवारपणे ओढून काढली.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now