अबब! 62 दिवस Coronavirus रुग्णावर चालू होते उपचार; डिस्चार्ज देताना हॉस्पिटलने दिले 8 कोटींचे बिल

अशाचा कोरोना व्हायरसशी झुंज देत असलेल्या अमेरिकेमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. इथे कोरोना संसर्गाच्या रूग्णाला जवळपास 11 लाख डॉलर्सचे (8.14 कोटी रुपयांचे) 181 पानांचे बिल दिले आहे.

Coronavirus Outbreak (Photo Credits: IANS)

कोरोना व्हायरस (Coronavirus) बाबत भारतासह देशातील विविध देशांची परिस्थितीत अतिशय बिकट होत आहेत. अनेक ठिकाणी आरोग्य सेवा अपुऱ्या पडत असलेल्या दिसत आहेत, तर काही ठिकाणी रुग्णालयांकडून रुग्णांची लुट चालू असल्याचे निदर्शनास आले आहे. अशाचा कोरोना व्हायरसशी झुंज देत असलेल्या अमेरिकेमधून (US) एक धक्कादायक घटना समोर येत आहे. इथे कोरोना संसर्गाच्या रूग्णाला जवळपास 11 लाख डॉलर्सचे (8.14 कोटी रुपयांचे) 181 पानांचे बिल दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मायकेल फ्लोर नावाच्या व्यक्तीवर इशाकमधील स्वीडिश मेडिकल सेंटरमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्यावर 62 दिवस उपचार सुरू होते आणि आता डॉक्टरांच्या बिलाच्या बाबतीत त्यांनी जणू काही जागतिक विक्रम नोंदवत फ्लोरला 8 कोटींचे बिल दिले. मात्र सरकार फ्लोरला याबाबत दिलासा देईल अशी माहिती मिळत आहे.

सिएटल टाईम्सच्या वृत्तानुसार, आजारपणामुळे फ्लोर इतके अशक्त झाले होते की, त्यांची पत्नी आणि मुलांनीही ते बरे होण्याची आशा सोडली होती. फ्लोर म्हणाले की, त्यांच्या उपचाराच्या बदल्यात 1.1 दशलक्ष डॉलर्सचे बिल त्यांना देण्यात आले आहे. उल्लेखनीय आहे की, स्वीडिश मेडिकल सेंटरमध्ये फ्लोरने 62 दिवस कोरोना विषाणूशी झुंज दिली आणि ते रुग्णालयात दीर्घकाळ उपचार घेणारे रुग्ण आहेत. फ्लोर यांच्याकडे आरोग्य विमा आहे, ज्यामध्ये सहा हजार डॉलर्सच्या कपातीनंतर सर्व खर्चाची सर्वसाधारणपणे विमा उतरविण्याची तरतूद आहे. कोविड-19 रूग्णांच्या उपचारासाठी कॉंग्रेसने (संसदेने) एक विशेष कायदा लागू केला आहे, त्यामुळे हे शक्य आहे की फ्लोरला काही पैसे द्यावे लागणार नाहीत. (हेही वाचा: भारतात आतापर्यंत एकूण 1,69,797 रुग्ण COVID19 पासून झाले बरे; देशाचा रिकव्हरी रेट 51.08 टक्क्यांपर्यंत वाढला)

फ्लोर म्हणाले की, 'कोरोना विषाणूच्या संसर्गाचा पराभव करून ते स्वत: चकित झाले आहेत.' दरम्यान, रुग्णालयाने जे 181 पृष्ठांचे बिल दिले आहे त्यामध्ये, आयसीयू बेडचे एका दिवसाचे भाडे 9736 डॉलर्स, 29 दिवसांचा व्हेंटिलेटर चार्ज 82215 डॉलर्स आणि हृदय, मूत्रपिंड आणि फुफ्फुसांच्या उपचारासाठी 2 दिवसांवरील खर्च 1 लाख डॉलर्स इ. चा समावेश आहे.