Urinary Auto-Brewery Syndrome: महिलेच्या मुत्राशयात युरिनऐवजी तयार होते 'दारू'; जाणून घ्या काय आहे 'युरिनरी ऑटो-ब्रेवरी सिंड्रोम'

ही बातमी ऐकूण कदाचित तुम्हाला धक्का बसेल. परंतु, ही बातमी अगदी खरी आहे.

Urinary Auto-Brewery Syndrome (Photo Credits: Pixabay)

Urinary Auto-Brewery Syndrome: अमेरिकेतील एका महिलेच्या मुत्राशयात (Bladder) लघवीऐवजी चक्क 'दारू' (Liquor) तयार होत आहे. ही बातमी ऐकूण कदाचित तुम्हाला धक्का बसेल. परंतु, ही बातमी अगदी खरी आहे. 61 वर्षीय महिला हा विचित्र आजार (Disease) झाला आहे. या आजारामुळे संबंधित महिला प्रचंड त्रस्त झाली आहे. विशेष म्हणजे जगात पहिल्यांदाचं असा आजार समोर आला आहे. या आजाराला 'युरिनरी ऑटो-ब्रेवरी सिंड्रोम' (Urinary Auto-Brewery Syndrome) असं म्हटलं जातं.

या आजारामुळे महिलेच्या मुत्राशयात लघवीऐवजी मद्य बाहेर पडत आहे. या आजाराने पीडित असलेल्या महिलेवर सध्या अमेरिकेतील पिट्सबर्ग विद्यापिठातील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या महिलेला मधुमेह व लिव्हर सिरॉसिसचा त्रास आहे. तिच्यावर काही दिवसांत यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होणार होती. परंतु, तिला यकृत देणारी व्यक्ती न मिळाल्याने तिच्यावर अद्याप शस्त्रक्रिया करण्यात आलेली नाही. (हेही वाचा - बर्फ पडलेल्या नदीत टिकटॉक व्हिडिओ बनवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा थोडक्यात वाचला जीव; पहा थरारक व्हिडिओ)

दरम्यान, डॉक्टरांनी या महिलेला 'अल्कोहोल अब्युज' पद्धतीने उपचार करण्याचा सल्ला दिला आहे. शक्यतो ज्या व्यक्ती दारूचे अतिसेवन करतात, अशा व्यक्तींना अल्कोहोल अब्युज पद्धतीने उपचार करण्याचा सल्ला दिला जातो. या सर्व प्रकारानंतर डॉक्टरांना पीडित महिला दारूचे अतिसेवन करत असल्याची शंका आली. त्यामुळे डॉक्टरांनी या महिलेची रक्त तपासणीदेखील केली. मात्र, या चाचणीमध्ये महिलेच्या रक्तात कोणत्याही प्रकारचा मद्याचा अंश सापडलेला नाही. परंतु, या चाचणीमध्ये महिलेच्या युरिनमध्ये ग्लुकोजचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे.

या महिलेला मधुमेहाचा त्रास असल्यामुळे तिच्या युरिनमध्ये साखरेचे अतिरिक्त प्रमाण आढळले आहे. तसेच डॉक्टरांच्या मते महिलेच्या यकृतामध्ये मोठ्या प्रमाणात यीस्ट गोळा झाले आहे. त्यामुळे पीडित महिलेच्या रक्तातील साखरेचे रुपांतर 'इथेनॉल' म्हणजेचं दारूमध्ये होत आहे. या सर्व प्रकारामुळे डॉक्टर्सही चकीत झाले आहेत. या आजाराने त्रस्त असलेली महिला कोणत्याही प्रकारचे मद्य सेवन करत नसली तरी तिच्यातील हा आजार अत्यंत भयानक असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. तसेच सध्या सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. ही बातमी ऐकूण अनेकांना धक्का बसला आहे.