तुर्की: दोन वर्षांची मुलगी दुसऱ्या मजल्यावरुन खाली पडली; युवकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण (Watch Video)
तुर्की येथील इस्तांबुल येथून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. एका दुमजली इमारतीवरुन एक 2 वर्षांची मुलगी खाली पडली. पण...
तुर्की येथील इस्तांबुल येथून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. एका दुमजली इमारतीवरुन एक 2 वर्षांची मुलगी खाली पडली. पण रस्त्यावर उभ्या असलेल्या एका 17 वर्षीय युवकाने तिला अलगद झेलले. त्यामुळे तिचा जीव वाचला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोहा मोहम्मद असे या मुलीचे नाव आहे. ती आपल्या दुसऱ्या मजल्यावरील घरातील बाल्कनीत खेळत होती. खेळता खेळता ती पडली. मात्र रस्त्यावर उभ्या असणाऱ्या 17 वर्षीय युवकाचे तिच्याकडे लक्ष गेले आणि त्याने तिला अलगद झेलले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून हा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे. (लहान मुलीला वाचवण्यासाठी कुत्र्याची धडपड; पहा व्हिडिओ)
पहा व्हिडिओ:
फेउजी जबाट या 17 वर्षीय मुलाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या चिमुकलीचे प्राण वाचले. यानंतर या मुलाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement