UP Cops Suspended for Making Reel With Property Dealer: प्रॉपर्टी डीलरसोबतची रील बनवणं पडलं महागात; गाझियाबादमध्ये 2 प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक निलंबित

दोन्ही उपनिरीक्षक अंकुर विहार पोलिस ठाण्यात तैनात आहेत. दोघांनी ट्रॉनिका सिटी पोलिस स्टेशन हद्दीतील प्रॉपर्टी डीलर सरताज यांच्यासोबत राजकुमार यांच्या 'चौधरी, तुम्ही आमच्या तहसीलदार साहेबांना भेटण्यास नकार दिला. याचा परिणाम तुम्हाला माहीत आहे का?' या डायलॉगवर रील बनवली. ही रील सरताजने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केली.

UP cops Reel With Property Dealer (PC - X/@priyarajputlive)

UP Cops Suspended for Making Reel With Property Dealer: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गाझियाबाद (Ghaziabad) मध्ये प्रॉपर्टी डीलर (Property Dealer) सोबत रील (Reel) केल्याप्रकरणी दोन उपनिरीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. ही रील सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. रीलमध्ये दिसलेल्या दोन्ही उपनिरीक्षकांच्या कार्यशैलीबाबत लोक सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित करत होते. त्यानंतर दोन्ही उपनिरीक्षकांना निलंबित करण्याची कडक कारवाई करण्यात आली आहे.

दोन्ही उपनिरीक्षक अंकुर विहार पोलिस ठाण्यात तैनात आहेत. दोघांनी ट्रॉनिका सिटी पोलिस स्टेशन हद्दीतील प्रॉपर्टी डीलर सरताज यांच्यासोबत राजकुमार यांच्या 'चौधरी, तुम्ही आमच्या तहसीलदार साहेबांना भेटण्यास नकार दिला. याचा परिणाम तुम्हाला माहीत आहे का?' या डायलॉगवर रील बनवली. ही रील सरताजने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केली. (हेही वाचा -Adorable Aadhaar Photoshoot: आधार कार्डसाठी फोटो काढताना मॉडेलींग, नेटीझन्सना आठवली 'Parle G Girl', चिमूकलीचा फोटो व्हायरल (Watch Video))

प्रॉपर्टी डीलर सरताजला अटक -

जेव्हा ही रील व्हायरल झाली तेव्हा लोकांनी पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले आणि विचारले की सरताजला सुरक्षा देण्यात आली आहे की त्याच्या सुरक्षेसाठी पोलिस तैनात आहेत? पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने दोन्ही उपनिरीक्षकांना निलंबित करण्यात आले. दोघांची विभागीय चौकशीही सुरू झाली आहे. दुसरीकडे, सोशल मीडियावर रील व्हायरल करणाऱ्या प्रॉपर्टी डीलर सरताजलाही अटक करण्यात आली आहे. (हेही वाचा - Instagram Reels Craze Takes Another Life: चालत्या दुचाकीवर रील बनवताना अपघातात तरुणाचा मृत्यू; धुळे-सोलापूर महामार्गावरील घटना (Watch Video))

पहा व्हिडिओ -

दोन्ही उपनिरीक्षकांची चौकशी सुरू -

उपनिरीक्षक धर्मेंद्र शर्मा आणि रितेश कुमार हे लोणीच्या अंकुर विहार पोलीस ठाण्यात तैनात असल्याचे तपासात समोर आले आहे. परंतु, प्रॉपर्टी डीलरचे कार्यालय ट्रॉनिका सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पवी सादिकपूर परिसरात आहे. दोन्ही उपनिरीक्षक प्रॉपर्टी डीलरच्या कार्यालयात का गेले? याचाही तपास अधिकारी करत आहेत. मात्र, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर निलंबनाची कारवाई तसेच विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now