IPL Auction 2025 Live

Tumkur DMO आणि Nursing College Principal यांनी कोविड-19 लस टोचून घेण्याचा केला दिखावा, खोट्या नाटकाचा व्हिडिओ व्हायरल; नेटिझन्सनी मागितले स्पष्टीकरण

कर्नाटक मध्ये Tumkur DMO आणि Nursing College च्या प्राचार्यांनी कोविड 19 लसीकरणादरम्यान कोवॅक्सिन लस टोचून घेतल्याचा दिखावा केल्याने नवा वादाला सुरूवात केली आहे.

Tumkur government nursing college principal and DMO 'pretending' to take Covaxin (Photo Credits: Twittere/Screengrab)

भारतामध्ये मोठ्या उत्साहात कोरोना विषाणू लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सध्या कोरोना योद्ध्यांचे लस टोचून घेत असलेले फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशात कर्नाटकमध्ये तुमकुर डीएमओ (Tumkur DMO) आणि नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्यांनी कोविड-19 लसीकरणादरम्यान कोवॅक्सिन लस टोचून घेतल्याचा दिखावा केल्याचे समोर आले आहे. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. केवळ मीडीया कव्हरेज मिळावे याकरिता हे नाटक केले असल्याचे समजत आहे. 16 जानेवारीपासून कर्नाटक मधील तूमकूर येथे लसीकरणाला सुरूवात झाली. Nagendrapada आणि Rajani हे दोघे जण लस टोचून घेणाऱ्या सुरूवातीच्या काही लोकांपैकी होते. या दोघांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता नेटकर्‍यांनी त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे.

सध्या सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या आणि झपाट्याने व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हे दोघेही लस टोचून घेत असल्याचे केवळ नाटक करत असल्याचे दिसत आहे. हे कृत्य केवळ मिडिया कव्हरेज मिळावे म्हणून केले असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मात्र वरिष्ठ लोकांकडून असे कृत्य घडल्याचे पाहता सोशल मिडियावर याबाबत टीकाही होत आहे. सध्या तिसर्‍या टप्प्यातील मानवी चाचणी सुरू असताना त्याला परवानगी कशी देण्यात आली? हा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. त्यानंतर आता मेडिकल कॉलेजमधील हा प्रकार समोर आल्याने अनेकांच्या मनात लसीकरणाबद्दल शंका निर्माण झाल्या आहेत. या लसीच्या प्रभावीपणाबाबत सरकारकडे पुरावे मागितले जात आहेत. नक्की वाचा : भारतामध्ये कोविड 19 लसीकरणानंतर 40 विद्यार्थी हॉस्पिटल मध्ये दाखल? जाणून घ्या फेक न्यूज रिपोर्ट वर PIB Fact Check ने दिलेली माहिती.

लस घेण्याचं नाटक ?

नेटकर्‍यांच्या प्रतिक्रिया

दरम्यान 16 जानेवारीपासून भारतात सर्वात मोठ्या कोविड 19 लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली आहे. यामध्ये सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला परवानगी देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यांमध्ये आरोग्य कर्मचारी, कोविड योद्धे यांना लस देण्यास सुरूवात झाली आहे. तर येत्या पुढील टप्प्यांमध्ये सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, सारे खासदार, आमदार आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी लस टोचून घेणार आहेत अशी माहिती समोर येत आहे.

भारतामध्ये लसीकरणाला सुरूवात झाली असली तरी लोकांचं लस टोचून घेण्याचं प्रमाण 50-60% आहे. अजूनही नागरिकांच्या मनात लस टोचून घेण्याबाबत साशंकता असल्याचं पहायला मिळालंं आहे.