Fact Check: LTE मोबाईल टॉवर्स बसवण्यासाठी 12,500 रुपये जमा करण्याचे TRAI कडून कंपनीला Tender? PIB ने केला खुलासा

त्यात Telecom Regulatory Authority of India (TRAI) ने एलटीई मोबाईल टॉवर्स उभारण्यासाठी एका कंपनीला पैसे जमा करण्याची परवानगी दिल्याचे म्हटले आहे.

Fake News on Mobile Tower Installation (Photo Credits: PIB)

सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यात Telecom Regulatory Authority of India (TRAI) ने एलटीई मोबाईल टॉवर्स (LTE Mobile Towers) उभारण्यासाठी एका कंपनीला पैसे जमा करण्याची परवानगी दिल्याचे म्हटले आहे. या  पोस्टमध्ये एनओसीसाठी अर्ज करण्याची पद्धत लिहिली असून एलटीई टॉवर इस्टॉलेशनसाठी 12,500 रुपये कंपनीला द्यावे, असे लिहिले  आहे. व्हायरल होणाऱ्या या टेन्डर अॅप्लिकेशनमुळे (Tender Application) लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

Telecom Regulatory Authority of India ने एका कंपनीला एनओसी प्रदान करण्यासाठी टेंडर अॅप्लिकेशन दिले आहे. या एनओसीसाठी कंपनीने 12,500 रुपये जमा करावे असे म्हटले आहे. ही एनओसी एलटीई मोबाईल टॉवर्सच्या इस्टॉलेशनसाठी आहे. दरम्यान, पीआयबीने या पोस्टची पडताळणी केली असून ती फेक असल्याचे सांगितले आहे. ट्रायकडून अशा कोणत्याही प्रकारचे डेंटर जारी करण्यात आलेले नाही, असेही पीआयबी फॅक्ट चेकने स्पष्ट केले आहे. (Fact Check: मोदी सरकार 'प्रधानमंत्री सबका साथ सबका विकास योजने' अंतर्गत प्रत्येकाला 1 लाख रुपयांचे वाटप करत आहे; जाणून घ्या सत्य)

Fact Check By PIB:

यापूर्वी अनेकदा सोशल मीडियावर फेक न्यूज व्हायरल झाल्या आहेत. यामुळे नागरिकांची फसवणूक, दिशाभूल होत असते. त्यामुळे सोशल मीडियावर दिसणाऱ्या कोणत्याही बातमीवर सत्य जाणून घेतल्याशिवाय विश्वास ठेवू नका. तसंच अशा पोस्ट शेअरही करु नका, असे आवाहनही वारंवार सरकारकडून करण्यात येत असते.