Tina Dabi Ex Husband Athar Amir Khan : बहुचर्चीत IAS अधिकारी टीना डाबीचा पूर्व पती अतहर अमीर खान बोहल्यावर चढण्यास सज्ज

टीना दाबी नंतर अतहर अमीर खान पुन्हा एकदा लग्न बंधनात अडकणार असुन त्यांची होणारी बायको डॉक्टर आहे.अतहर अमीर खानने त्यांच्या होणार्‍या पत्नी डॉ. मेहरीन काझीसोबत साखरपुड्याचे फोटो त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहे.

आयएएस (IAS) टीना दाबींचा (Tina Dabi) पूर्व पती अतहर अमीर खान (Athar Amir Khan) टीना बरोबर झालेल्या घटस्फोटानंतर आता पुन्हा बोहल्यावर चढण्याच्या  तयारीत आहे. अतहर अमीर खान यांची होणारी बायको म्हणजेच मेहरीन काझीने (Mehreen Qazi) तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर (Instagram) अतहर अमीर खान सोबत फोटो शेअर करत ही बातमी दिली आहे.

अतहर अमीर खान, हे खुद्द 2015 UPSC बॅचमध्ये दुसरा क्रमांक पटकावणारे टॉपर असुन बहुचर्चीत IAS टीना दाबीचा पूर्व पती आहेत. टीना दाबी नंतर अतहर अमीर खान पुन्हा एकदा लग्न बंधनात अडकणार असुन त्यांची होणारी बायको डॉक्टर आहे. अतहर अमीर खानने त्यांच्या होणार्‍या पत्नी डॉ. मेहरीन काझीसोबत साखरपुड्याचे फोटो त्यांच्या सोशल मीडियावर (Social Media) #engagement या हॅशटॅगसह शेअर केले आहे. अतहर अमीर खान आणि IAS टीना दाबी हे त्यांच्या कामासंबंधी किंवा लुक्स बाबत चर्चेत असतात. अतहर अमीर खानच्या साखरपुड्याचे फोटोस सोशल मिडीयावर जोरदार ट्रेंड (Trend) होताना दिसत आहे. (हे ही वाचा:-Mumbai Goa Express Way: मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद, लोटे चिरणी कळबस्ते मार्गाने वाहतूक वळवली)

 

View this post on Instagram

 

A post shared by Athar Aamir Khan (@atharaamirkhan)

आयएएस टीना दाबी आणि पूर्व पती अतहर अमीर खान या दोघांची भेट मसुरीत IAS प्रशिक्षणा दरम्यान झाली होती. प्रशिक्षणानंतर त्यांनी 2018 मध्ये लग्न केले. तथापि, बहुचर्चित लग्न फार काळ टिकले नाही. लग्नाच्या  तीन वर्षानंतर खान आणि दाबी यांचा 10 ऑगस्ट 2021 रोजी घटस्फोट झाला. या वर्षी एप्रिलमध्ये टीना दाबी आणि डॉ. प्रदीप गावंडे (Dr. Pradeep Gawande) यांनी राजस्थानच्या (Rajsthan) जयपूरमध्ये (Jaipur) विवाह बंधनात अडकले. तर अतहर अमीर खान आता पुन्हा बोहल्यावर चढण्यास  सज्ज आहेत.

 

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now