TikTok Video मधून चीट करणाऱ्या बॉयफ्रेंडचं भांडं फोडलं; दुसऱ्या मुलीसोबतच्या चॅट्सचे स्क्रिनशॉट केले शेअर
एका मुलीने आपल्या फसवणाऱ्या बॉयफ्रेंडचा भांडाफोड केला आहे. या मुलीचे नाव ऑटम मुरे (Autumn Moore) असून तिने आपल्या बॉयफ्रेंडने दुसऱ्या मुलीसोबत केलेल्या चॅट्सचे स्क्रिनशॉट काढून त्याचा व्हिडीओ टिकटॉकवर अपलोड केला आहे
टिकटॉकचे काही व्हिडीओ (Tiktok Video) आजवर अनेकदा वादाचे कारण ठरले आहेत, व्हिडीओ शेअरिंगच्या या जगप्रसिद्ध ऍपवर नेहमीच काही ना काही खास ट्रेंड येत असतात. अलीकडे या ऍप्लिकेशनवर लॉयलटी टेस्ट (Loyalty Test) सुरु आहे. आपला पार्टनर किती लॉयल आहे किंवा किती चीट आहे हे दाखवणारे व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहेत. अलीकडेच या माध्यमातून एका मुलीने आपल्या फसवणाऱ्या बॉयफ्रेंडचा भांडाफोड केला आहे. या मुलीचे नाव ऑटम मुरे (Autumn Moore) असून तिने आपल्या बॉयफ्रेंडने दुसऱ्या मुलीसोबत केलेल्या चॅट्सचे स्क्रिनशॉट काढून त्याचा व्हिडीओ टिकटॉकवर अपलोड केला आहे. तसेच हा व्हिडीओ ट्विटर वर सुद्धा अपलोड करण्यात आला असून त्याला आतापर्यंत 3.9 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. शिक्षक आणि विद्यार्थिनीचा अश्लील TikTok व्हिडीओ झाला व्हायरल; दोघांना करावं लागलं लग्न
ऑटमच्या बॉयफ्रेंडने एका मुलीचे नाव जेसन वर्क 19 असे सेव्ह केले होते ज्यावरून कोणालाही हा कामाचा कॉन्टॅक्ट असल्याचे वाटेल. मात्र चॅट उघडताच यामध्ये बेबी म्हणत फ्लर्ट करतानाचे चॅट्स आहेत.अनेकदा यात किसिंग, हार्ट ईमोजी सुद्धा वापरले आहेत. जेव्हा ऑटम हा व्हिडीओ शूट करत होती तेव्हा तिचा बॉयफ्रेंड झोपला होता, त्यामुळे अनेकांनी या व्हिडीओ खाली मजेशीर कमेंट्स करत त्याला आता त्याची झोप कायमची उडणार आहे याची कल्पना सुद्धा नसेल असे म्हंटले आहे.
पहा हा व्हायरल व्हिडिओ
Damn he do be sleeping good doe (she caught her man cheating) pic.twitter.com/pB5X1NzbLn
— S.🎨 (@makeupbyshaniah) February 3, 2020
ऑटमने व्हिडीओ मध्ये म्हंटल्याप्रमाणे तिच्या बॉयफ्रेंडने चीट करण्याची ही काही पहिली वेळ नाही यापूर्वी सुद्धा अनेकदा त्याला रंगेहाथ पकडून तिने त्याला सुधारण्याची वार्निंग दिली होती. तसेच तिने आपल्या मागील रिलेशनच्या बाबतीत सुद्धा वाईट अनुभव आल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, हा केवळ एक व्हायरल व्हिडिओचा भाग नसून या मार्फत समाजमाध्यमांची नात्यातील जागा दिसून येत आहे, या ना त्या कारणाने नात्यात पार्टनर कडून फसवणूक झाली असताना आपले दुःख शेअर करण्यासाठी अनेकजण या मार्गाचा वापर करत आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Feb 06, 2020 01:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

