Woman Destroys Onam Pookalam: महिलेने पुसली ओणम निमित्त मुलांनी बनवलेली खास फुलांची रांगोळी; पुढे काय झालं? वाचा

ही महिला बेंगळुरूच्या आरके हेगडे नगर येथील थानिसांद्रा मेन रोडवर असलेल्या मोनार्क सेरेनिटी येथील रहिवासी आहे. सिमी नायर असं या महिलेचं नाव आहे.

Woman Destroys Onam Pookalam (फोटो सौजन्य - X/@karnatakaportf)

Woman Destroys Onam Pookalam: कर्नाटकमधील एका महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल होत आहे. पोलिसांनी गुरुवारी एका व्हायरल व्हिडिओ (Viral Video) च्या संदर्भात बेंगळुरूतील एका महिलेविरुद्ध तक्रार नोंदवली. या व्हिडिओमध्ये ही महिला मुलांनी ओणम निमित्त बनवलेली खास फुलांची रांगोळी (Rangoli of Flowers) म्हणजेच पुकलम (Pookalam) (रंगीबेरंगी फुलांची मांडणी) मिटवताना दिसली. प्राप्त माहितीनुसार, आरोपी महिलेविरुद्ध द्वेष आणि गुन्हेगारी धमकीला प्रोत्साहन देण्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. ही महिला बेंगळुरूच्या आरके हेगडे नगर येथील थानिसांद्रा मेन रोडवर असलेल्या मोनार्क सेरेनिटी येथील रहिवासी आहे. सिमी नायर असं या महिलेचं नाव आहे.

रांगोळी पुसतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या व्हिडिओमध्ये महिला तिच्या हाउसिंग सोसायटीतील रहिवाशांशी कॉमन एरियामध्ये ठेवलेल्या फुलांच्या रांगोळीवरून वाद घालताना दिसली. एका रहिवाशाने तिला समजावून सांगितले की लॉबी ही एक सामायिक जागा आहे. यावेळी महिलेने पायाच्या साहाय्याने पुकलम म्हणजेचं फुलांची रांगोळी पुसून टाकली. (हेही वाचा - Dombivli Urine Case: पिशवीत लघवी करणाऱ्या तरुणावर कारवाई; डोंबिवली येथील घटना, Video Viral)

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक यूजर्संनी महिलेच्या या कृतीवर प्रतिक्रिया नोंदवली आहे. यातील एका यूजर्सने म्हटलं आहे की, तिने इतरांच्या परंपरांचा आदर करायला हवा होता. दुसऱ्या एका यूजरने लिहिलं आहे की, 'हे खरोखर निर्लज्ज वर्तन होते!' (हेही वाचा - Desi Jugaad Viral Video: महिलेने लावला अप्रतिम शोध, इंडक्शनवर देसी स्टाईलमध्ये भाजल्या पोळ्या, येथे पाहा व्हिडीओ)

महिलेने पुसली ओणम निमित्त मुलांनी बनवलेली खास फुलांची रांगोळी, पहा व्हिडिओ - 

दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिलं आहे की, 'पुकलम, एक सुंदर फुलांची मांडणी, महत्त्वपूर्ण सांस्कृतिक मूल्य धारण करते आणि ते आनंद आणि उत्सवाचे प्रतीक आहे. समाजाला आनंद देणारी एखादी गोष्ट उध्वस्त करून तिने इतरांच्या भावनांचा अनादर केला आहे. ही घटना आपले जीवन समृद्ध करणाऱ्या विविध संस्कृती आणि परंपरांचा आदर करण्याच्या महत्त्वाची आठवण करून देणारी आहे.