Sky Pool Viral Video: जमिनीपासून 115 फूट उंच हवेत आहे हे स्विमिंग पूल, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण
हे पूर्णपणे पारदर्शक स्विमिंग पूल आहे. ज्यामुळे तुम्हाला यात पोहत असताना तुम्हाला चहू बाजूंनी पाहता येईल.
तुम्ही जमिनीवरील, अगदी इमारतीच्या टेरेसवरील स्विमिंग पूल (Swimming Pool) पाहिले असेल. मात्र तुम्ही कधी हवेतील स्विमिंग पूल पाहिले आहे का? ऐकायला थोडं विचित्र वाटेल मात्र जगाच्या पाठीवर असे एक स्विमिंग पूल आहे जे जमिनीपासून 115 फूट वर हवेमध्ये आहे. या स्विमिंग पूल खास गोष्ट म्हणजे या पूलमधून तुम्हाला खालील जमिनसुद्धा पाहता येईल. हे पूर्णपणे पारदर्शक स्विमिंग पूल आहे. ज्यामुळे तुम्हाला यात पोहत असताना तुम्हाला चहू बाजूंनी पाहता येईल.
हे ऐकल्यावर तुम्हाला धक्का बसला असेल आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल की हे स्विमिंग पूल नेमके आहे तरी कुठे? आकाशात तरंगणारा हा स्विमिंग पूल लंडनमध्ये आहे. या पूलचे नाव स्काय पूल असे आहे. हे जमिनीपासून 115 फूट उंचीवर आहे. ब्रिटेनचे लोक या पूलला घेऊन खूपच उत्साहित आहेत. या स्विमिंग पूलचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.हेदेखील वाचा- Viral Video: कॅरम खेळताना दोन म्हाता-यांमध्ये झाले लहान मुलांसारखे भांडण, पुढे झाले असे काही पाहून तुम्हाला होईल हसू अनावर
हा पूल 25 मीटर लांब आणि 14 मीटर रुंद आहे. या पूलमध्ये पोहताना तुम्हाला वरून अथवा खालून कुठल्याही दिशेला पाहता येईल जेथून तुम्हाला आजूबाजूचा सर्व नजारा पाहता येईल. या पूलमध्ये 400 टन इतके पाण्याचा साठा करता येतो. हे पारदर्शक पूल असल्यामुळे तुम्ही यात पोहताना तुम्हाला आकाशात तरंगण्याचा अनुभव मिळेल. या स्विमिंग पूलला शहरातील दोन लग्जरी टॉवर ब्लॉक्सच्या दहाव्या मजल्यावर जोडण्यात आले आहे.