Video: रुग्णालयातील कर्मचाऱ्याची वृध्द रुग्णाला मारहाण, नेटकरी संतापले
रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने वृध्द रुग्णाला मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Video: रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने वृध्द रुग्णाला (Hospital Staff Hits Patient) मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. रुग्णालयातील कर्मचारी वृध्दाच्या पोटात हाताने आणि कोपऱ्याने मारहाण करत असताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच, नेटकऱ्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यावर संताप व्यक्त केला आहे. (हेही वाचा- ट्रेनच्या सीटवर सामान ठेवल्यामुळे दोघांमध्ये पेटला वाद,Video व्हायरल झाल्यानंतर रेल्वेने दिली प्रतिक्रिया)
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी 19 जून रोजी ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. घटनेचे नेमके ठिकाणी अद्याप समोर आले नाही. रुग्णालयातील कर्मचारी रुग्णावर क्रूर कृत्य का करत आहे हे देखील समजू शकले नाही. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी नेटकरी करत आहे. नेटकऱ्यांनी सांगितले आहे की, अश्या कारणांमुळे कधीही आपल्या रुग्णांना एकटे सोडून जाऊ नका.
लोग डॉक्टर को भगवान का दर्जा दिए है
परंतु यहाँ डॉक्टर- शैतान का रूप में है देखिए 😳😳 pic.twitter.com/y8BrEj386x
— Prof. Sudhanshu Trivedi (@Sudanshutrivedi) June 24, 2024
लोग डॉक्टर को भगवान का दर्जा दिए है
परंतु यहाँ डॉक्टर- शैतान का रूप में है देखिए 😳😳 pic.twitter.com/y8BrEj386x
— Prof. Sudhanshu Trivedi (@Sudanshutrivedi) June 24, 2024
व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, रुग्णालयातील गणवेश परिधान केलेला कर्मचारी रुग्णाजवळ जातो. बेड जवळचा पडदा बंद केल्यानंतर त्याच्या कोपऱ्याने रुग्णाच्या पोटात मारतो आणि घटनास्थळावरून पळून जातो. ही घटना वॉर्डात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होते. एका वापरकर्त्यांनी लिहले आहे की, आपण डॉक्टरांना देव म्हणतो आणि एकीकडे डॉक्टरच सैनात बनले आहे. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहले आहे की, हा डॉक्टर नसून रुग्णालयातील कर्मचारी आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 25, 2024 09:38 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

