Cycle Stunt Viral Video: मुलीने उंच टेकडीवरून सायकलसह मारली उडी; व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा

हा व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क व्हाल. असा स्टंट तुम्ही याआधी क्वचितच पाहिला असेल.

Cycle Stunt Viral Video (PC- Instagram)

Cycle Stunt Viral Video: तुम्ही चित्रपटांमध्ये सायकल स्टंटचे अनेक धोकादायक व्हिडिओ पाहिले असतील. पण, खऱ्या आयुष्यात तुम्ही एखाद्या उंच टेकडीवरून सायकलवर धोकादायक स्टंट करताना पाहिला आहे का? सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी सायकलसह उंच टेकडीवरून खाली उडी मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाच्या अंगावर काटा येईल.

व्हिडिओमध्ये तरुणी सायकलवरून स्टंट करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क व्हाल. असा स्टंट तुम्ही याआधी क्वचितच पाहिला असेल. एका उंच टेकडीवर एक मुलगी सायकल घेऊन उभी असल्याचे दिसून येत आहे. त्याचवेळी त्याच्या शेजारी आणखी एक मुलगी उभी असलेली दिसते. तेव्हाच सायकल असलेली मुलगी सायकलसह पुढे सरकते आणि टेकडीवरून उडी मारते. हे दृश्य खूपच रोमांचक आहे. (हेही वाचा - Horse Travelling in a Local Train: रेल्वेत प्रवाशांसोबत घोड्यानेही केला प्रवास; फोटो व्हायरल झाल्यानंतर रेल्वेने दिले चौकशीचे आदेश)

व्हिडीओमध्ये पुढे पाहता येते की, टेकडीवरून उडी मारल्यानंतर मुलगी सुखरूप जमिनीवर पोहोचते. यानंतर, ती वेगाने सायकल चालवते आणि समोर दिसणारी दुसरी टेकडी चढते. हे पाहून तुम्हाला नक्कीचं आश्चर्य वाटेल. कारण, ती ज्या टेकडीवर चढते ती खूप उंच टेकडी आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by BEAUTIFUL DESTINATIONS (@beautifuldestinations)

व्हिडीओमध्ये पाहून असे अजिबात वाटत नाही की, एवढा धोकादायक स्टंट करताना मुलगी थोडीशी घाबरली असावी. हा धक्कादायक व्हिडिओ beautifuldestinations नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ इतका जबरदस्त आहे की, त्याला आतापर्यंत 95 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. त्याच वेळी, 61 लाखांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे. व्हिडिओ पाहून एका यूजरने कमेंट केली की, 'थोडीही चूक मुलीसाठी जीवघेणी ठरू शकली असती.'



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif