Online Food Delivery: डिलिव्हरी बॉयने वाटेतचं खाल्ले चिकन; ग्राहकासाठी ठेवले फक्त हाडे; चिठ्ठी लिहून सांगितलं 'हे' कारण

न्यूयॉर्क पोस्टच्या म्हणण्यानुसार, त्या व्यक्तीने डोअरडॅश ऍप्लिकेशनवर चिकन विंग्सची ऑर्डर दिली पण, जेव्हा त्याने पॅकिंग उघडले तेव्हा त्याला बॉक्समध्ये फक्त हाडे आढळली.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Online Food Delivery: आजकाल ऑनलाइन फूड ऑर्डर (Online Food Order) करणे हा एक ट्रेंड झाला आहे. जेंव्हा आपल्याला काहीतरी वेगळं किंवा आवडतं खावंसं वाटतं आणि ते घरी बनवावंसं वाटत नाही, तेव्हा फक्त आपल्या मोबाईलवरून ऑनलाइन अॅप्सद्वारे आपण ते ऑर्डर करू शकतो. काही वेळातचं आपल्या घरी हवा तो पदार्थ मिळतो. सध्या सोशल मीडियावर एक बातमी खूपचं व्हायरल होत आहे.

एका व्यक्तीने चिकन विंग्ज आणि ज्यूस मागवला होता. पण जेव्हा फूड पॅकेज त्याच्यापर्यंत पोहोचले तेव्हा तो चक्रावून गेला. वाटेत डिलिव्हरी बॉय (Delivery Boy) ने चिकनचे विंग्ज खाल्ले. डिलिव्हरी बॉयने हाडांसह एक चिठ्ठी ग्राहकासाठी सोडली. त्या व्यक्तीने टिकटॉकवर त्याचा व्हिडिओही शेअर केला आहे, जो खूप व्हायरल होत आहे. (हेही वाचा - Viral Video: पापड वाढण्यास नकार दिल्याने लग्नात तुफान हाणामारी; 3 जण जखमी तर तब्बल दीड लाखाचे नुकसान (Watch))

न्यूयॉर्क पोस्टच्या म्हणण्यानुसार, त्या व्यक्तीने डोअरडॅश ऍप्लिकेशनवर चिकन विंग्सची ऑर्डर दिली पण, जेव्हा त्याने पॅकिंग उघडले तेव्हा त्याला बॉक्समध्ये फक्त हाडे आढळली. त्यासोबत एक चिठ्ठीही सापडली. त्यात लिहिले होते की, " मला खूप भूक लागली होती म्हणून चिकन खाल्ले पण, ज्यूस तसचं आहे. ज्यूसला हातही लावलेला नाही. तुम्ही ज्यूस पिऊ शकता." हा व्हिडिओ Tiktok युजर @thesuedeshow ने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ऑगस्टमध्ये हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता. जो 229,000 पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. व्हिडीओ बनवणारी व्यक्ती सांगत आहे की, डिलिव्हरी बॉयने ज्यूसला हात लावला नाही. बॉक्समध्ये फक्त चिकन विंग्जची हाडे पाहून मी दुःखी आणि आश्चर्यचकित आहे. परंतु, डिलिव्हरी बॉयचा प्रामाणिकपणा चांगला होता. त्याने माझ्यासाठी ज्यूस तसाच ठेवला.



संबंधित बातम्या

Karnataka Tahsildar Slams Government Jobs: 'सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा मंचूरियन, पाणीपुरी विक्रेत्याचे आयुष्य बरे'; कामाच्या तणावाला कंटाळून तहसीलदार राजीमाना देण्याच्या तयारीत

Pushpa 2 Premiere Tragedy: हैदराबाद येथे झालेल्या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या श्री तेज यांच्याबाबत अल्लू अर्जुनचे वक्तव्य, म्हणाले- 'मी त्याच्या प्रकृतीबद्दल अत्यंत चिंतेत आहे'

Best Food City In The World: जगातील सर्वोत्तम खाद्य शहरांमध्ये मुंबई 5 व्या क्रमांकावर; Taste Atlas ने जारी केली यादी, इतरही अनेक भारतीय शहरांचा समावेश (See List)

Canteen Owner Bites Man's Ear Over Food Bill: पुष्पा 2 पाहिल्यानंतर कॅन्टीनच्या मालकाचं फिरलं डोक; बिलावरून झालेल्या भांडणात घेतला तरुणाच्या कानाला चावा