बिहार: भरधाव ट्रेनसमोर मुलांनी मारल्या पाण्यात उड्या; पहा जीवघेणा खेळाचा अंगावर काटा आणणार व्हिडिओ

सध्या सोशल मीडियावर भरधाव ट्रेनसमोर (Train) स्टंट करणाऱ्या मुलांचा एक थरकाप करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बिहारमधील (Bihar) चंपारण जिल्ह्यातील बेतियामधील आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

बिहार: भरधाव ट्रेनसमोर मुलांनी मारल्या पाण्यात उड्या; पहा जीवघेणा खेळाचा अंगावर काटा आणणार व्हिडिओ
Children jumped into the water in front of the running train (PC - Twitter)

सध्या सोशल मीडियावर भरधाव ट्रेनसमोर (Train) स्टंट करणाऱ्या मुलांचा एक थरकाप करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बिहारमधील (Bihar) चंपारण जिल्ह्यातील बेतियामधील आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

या व्हिडिओमध्ये एका नदीवर रेल्वेचा पूल आहे. या नदीत उडी मारण्यासाठी काही मुलं या रेल्वेच्या पुलावर उभी आहेत. ट्रेन अगदी जवळ आल्यानंतर या मुलांनी नदीत उडी मारली आहे. सुदैवाने यात काही विपरित प्रकार घडला नाही. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक नेटीझन्सनी या मुलांच्या आई-वडिलांना दोष दिला आहे. अशा चुकांमुळे सरकारला दोष देणं चुकीचं असल्याचंदेखील एका यूझर्सने म्हटलं आहे. (हेही वाचा - Shantabai Pawar Viral Video: पुणे मध्ये अर्थाजनासाठी लाठी-काठींची कसरत करणार्‍या शांताबाई पवार यांचा व्हिडिओ सोशल मीडीयात व्हायरल; अभिनेता रितेश देशमुख सह मदतीसाठी पुढे आले अनेक हात!)

दरम्यान, या धक्कादायक व्हिडिओची रेल्वे विभागाने गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक चौकशी करत आहेत. विशेष म्हणजे मुलं हा जीवघेणा खेळ खेळत असताना नदी किनारी बसलेले लोक हे दृश्य कॅमेऱ्यात कैद करत होती. सुदैवाने या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

(The above story first appeared on LatestLY on Jul 25, 2020 04:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).