Tattoo Model Kerstin Tristan (PC - Instagram)

Tattoo Model Kerstin Tristan Photos: टॅटूवर लाखो रुपये खर्च करणार्‍या एका आजीने अनेक दशकांपूर्वीची छायाचित्रे शेअर केली आहेत. यात गेल्या काही वर्षांत तिची प्रतिमा कशी बदलली आहे हे दाखवण्यात आलं आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, कर्स्टिन ट्रिस्टन (Kerstin Tristan) ने आतापर्यंत तिच्या टॅटूवर £25,000 (रु. 24 लाखांहून अधिक) खर्च केले आहेत आणि आता तिने तिच्या Instagram खात्यावर आधी आणि नंतरचे चित्र अपलोड केले आहेत.

कर्स्टिन ट्रिस्टनने तिचे 30 वर्षांपूर्वीचे, 8 आठ वर्षांपूर्वीचे आणि आताचे फोटो शेअर केले आहेत. 1992, 2014 आणि 2022 मध्ये कर्स्टिन कशी दिसत होती, हे आपण तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाहू शकतो. तिन्ही चित्रांमध्ये कर्स्टिनची वेगवेगळी रूपे पाहायला मिळाली. सहा वर्षांपूर्वी तिने @tattoo_butterfly_flower नावाने Instagram वर खाते सुरू केले होते. सध्या तिचे सुमारे दोन लाख फॉलोअर्स आहेत. क्रेस्टीनने या अकाउंटवर तिचे टॅटू केलेले फोटो शेअर केले आहेत. (हेही वाचा - Kim Kardashian चे Bikini मधले सेक्सी फोटो व्हायरल, पाहा फोटो)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kerstin Tristan (@tattoo_butterfly_flower)

क्रेस्टीनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल -

50 वर्षीय क्रेस्टीनने तिच्या टॅटूमुळे सोशल मीडियावर दबदबा निर्माण केला आहे. टॅटू मॉडेल क्रिस्टिनने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर अनेक हॉट फोटो शेअर केले आहेत. जर्मनीतीलया टॅटू मॉडेलने 5 वर्षांपूर्वी तिच्या शरीरावर पहिला टॅटू बनवला आणि आज तिच्या शरीराच्या प्रत्येक भागावर टॅटू आहेत. तिच्या अंगावर रंगीबेरंगी फुल, पक्षी, फुलपाखराच्या डिझाईन्स आहेत. आपला छंद पूर्ण करण्यासाठी तिने कोणाचीही पर्वा केली नाही. बातम्यांनुसार, कर्स्टिनला कपडे घालण्याचा आळस येतो. त्यामुळे ती नेहमी कमी कपडे घालते आणि बाकीच्या भागांवर टॅटू बनवते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kerstin Tristan (@tattoo_butterfly_flower)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kerstin Tristan (@tattoo_butterfly_flower)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kerstin Tristan (@tattoo_butterfly_flower)

दरम्यान, 50 वर्षीय कर्स्टिन ट्रिस्टन सोशल मीडियावर तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. ज्यातून ती लाखो रुपये कमवत असते. तिला टॅटू काढण्याचे व्यसन लागले असून आता तिच्या शरीरावर शेकडो टॅटू आहेत. तरीही तिला तिच्या शरीरावर आणखी बरेच टॅटू काढायचे आहेत. परंतु, आता टॅटू काढण्यासाठी एकही भाग शिल्लक राहिलेला नाही.