कोराेना विषाणूशी लढणाऱ्या मदतगारांना धन्यवाद Google Doodle: गुगलने मानले Coronavirus Pandemic दरम्यान फूड डिलिव्हरी पुरवणाऱ्यांचे अ‍ॅनिमेटेड डुडलच्या माध्यमातून आभार!

गूगलच्या Thank You Coronavirus Helpers सीरीजमध्ये आज गूगल डुडलच्या माध्यमातून फूड डिलिव्हरी पुरवणाऱ्यांना खूप खूप धन्यवाद म्हणजे खास अ‍ॅनिमेटेड माध्यमातून मानवंदना देण्यात आली आहे.

Google Doodle | Photo Credits: Google.com

कोरोना व्हायरसच्या जागतिक संकटात आता लॉकडाऊनमध्ये अडकलेलं अवघं जग यामधून लवकरात लवकर सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधत आहे. पण या कठीण काळातही कोरोना व्हायरस विरूद्ध लढण्यासाठी काही घटक जीवाची बाजी लावून काम करत आहे. अशांपैकी एक म्हणजे फूड डिलेव्हरी देणारे मदतनीस. गूगलच्या Thank You Coronavirus Helpers सीरीजमध्ये आज गूगल डुडलच्या माध्यमातून फूड डिलिव्हरी पुरवणाऱ्यांना खूप खूप धन्यवाद म्हणजे खास अ‍ॅनिमेटेड माध्यमातून मानवंदना देण्यात आली आहे. Google या शब्दामधील E हे अक्षर आज या डुडलच्या माध्यमात 'स्वयंपाकी' झाला आहे. तर G या अक्षराकडून त्याला धन्यवाद म्हणण्यासाठी खास हार्ट पाठवत आहे. कोराेना विषाणूशी लढणाऱ्या मदतगारांना धन्यवाद देण्यासाठी Google ने साकारलं Packaging, Shipping, and Delivery Workers साठी खास Doodle.

भारतामध्ये मार्च महिन्याच्या मध्यात जेव्हा कोरोना व्हायरसचा आकडा वाढत असल्याचा धोका समोर आला तेव्हा लॉकडाऊन जाहीर केलं. मात्र या संयमाच्या काळात पोलिस, डॉक्टर्स, सफाई कर्मचारी रस्त्यांवर उतरून काम करत होते. लॉकडाऊन जाहीर झाल्याने अनेक मजूर देशात विविध टोकांवर अडकून पडले. मात्र यांना उपाशी पोटी झोपावं लागू नये म्हणून अनेक ठिकाणी कम्युनिटी किचन सुरू करण्यात आली. नियमित ताज्या शिजवलेल्या अन्नाची लाखो पाकीटं वाटली जात आहेत. मुंबईसारख्या ठिकाणी रूग्ण सेवा देणार्‍या डॉक्टर, नर्स यांना अनेक पंचतारांकित हॉटेल्स खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे कोरोना संकटाच्या काळात धैर्याने लढणार्‍यांच्या जेवणाची सोय करणार्‍या अनेक स्वयंपाकीचाही सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. दरम्यान सध्या सामान्यांसाठी हॉटेल्स, रेस्ट्रॉरंट्स खुली नसली तरीही काही निवडक हॉटेल्समधून फूड डिलेव्हरी काही प्रमाणात आता सुरू करण्यात आली आहे.कोरोना व्हायरस जागतिक आरोग्य संकटाचा मुकाबला करण्यासाठी 'घरी रहा सुरक्षित रहा' आवाहन करणारं खास गूगल डूडल.

भारतात दिवसागणिक कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक रूग्ण आहेत. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 11933 वर पोहचला आहे. तर महाराष्ट्रात रूग्णसंख्या 3000 च्या जवळ पोहचली आहे. जगभरातही कोरोनाचं थैमान सुरू आहे. अमेरिका हे सध्या कोरोना व्हायरसचं नवं केंद्र बनलं आहे. जगात कोरोनाचे 20 लाखाहून अधिक रूग्ण आहेत.

गूगलने कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी आणि या आजाराबाबत समाजात जनजागृती पसरवण्यासाठी गूगल डुडलच्या माध्यमातून एक विशेष सीरीज सुरू केली आहे. यामध्ये सुरूवातीला हात स्वच्छ धुण्याचं टेक्निक सांगणारं, त्यानंतर डॉक्टर्स, नर्सचे आभार मानणारे, किराणामाल सामान पुरवणारे यांचे आभार मानणारी गूगल डुडल्स साकारली होती.