IPL Auction 2025 Live

ठाणे, पवई तलावात डॉल्फिन दिसल्याचे खोटे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल

मात्र आता ठाणे आणि पवई येथे सुद्धा डॉल्फिन दिसल्याचे खोटे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात युजर्सकडून व्हायरल करण्यात आले आहेत.

Dolphins in Thane funny pics (Photo Credits: Twitter)

देशभरात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउनची परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र रविवारी मुंबईतील मरिन ड्राइव्ह येथे डॉल्फिन्सचे दर्शन घडले. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरस होत आहे. तसेच नागरिकांना मरिन ड्राइव्हच्या समुद्रात तीन डॉल्फिन दिसल्याने आनंद व्यक्त केला होता. मात्र आता ठाणे आणि पवई येथे सुद्धा डॉल्फिन दिसल्याचे खोटे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात युजर्सकडून व्हायरल करण्यात आले आहेत.

राज्यात 31 मार्चपर्यंतची लॉकडाउनचे आदेश दिल्यानंतर घरातील काही जण घराबाहेर पडल्याचे दिसून आले. पण 22 मार्चला देशभरात जनता कर्फ्यू लागू करण्यात आल्यानंतर त्याचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे आभार सुद्धा मानले. तर रविवारी मरिन ड्राइव्हला तीन डॉल्फिन दिसून आले. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता काही युजर्सनी ठाण्यातील उपवन आणि पवई तलावात सुद्धा डॉल्फिन दिसल्याचे खोटे, हास्यात्मक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट केले आहेत.यामुळे लोकांना काय बोलायचे हे कळतच नाही. काही ही असो पण देशातील कोरोनाची परिस्थिती ही गांभीर्याने घेतली पाहिजे असे आवाहन आज नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना केले आहे. तसेच जोक बाजूला ठेवता कोरोनाच्या स्थितीपासून स्वत:चा बचाव करा.(मुंबई: कोरोना व्हायरसमुळे जनता कर्फ्यूची परिस्थिती असताना मरिन ड्राइव्ह येथे दिसले डॉल्फिन Watch Video)

डॉल्फिन्स ठाणे आणि पवई तलावात दिसल्याचा खोटा फोटो:

डॉल्फिन्स ठाणे आणि पवई तलावात दिसल्याचा खोटा व्हिडिओ:

WhatsApp वर व्हायरल झालेला फोटो:

Dolphin in Thane WhatsApp forward (Photo Credits: File Image)

कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी भारताचा आता अत्यंत कठीण काळ सुरू झाला आहे. यामध्ये कोरोना व्हायरस झपाट्याने वाढू शकतो. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. पूर्वी केवळ मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड या भागात लागू असलेले कलम 144 आता राज्यभर लागू करण्यात आले आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 89 वर तर राज्यात 400 पेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत.