Thailand :शिक्षकाला इंजिनमध्ये सापडला 13 फूट लांब Python, अथक परिश्रमानंतर अजगराला बाहेर काढण्यात यश ( Watch Video )

Tug of War With a Snake! (Photo Credits: Video Screengrab/ @cgtnamerica/ Twitter)

साप किती ही भव्य असले तरीही त्यांना घाबरल्याशिवाय कोणीच राहत नाही.त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचा संशयास्पद स्वभाव आणि अनपेक्षित ठिकाणी लपण्याची सवय. तर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत ज्यावरून असे दिसून येते की सपांनी अचानक त्याच्या दिसण्याने लोकांना कसे आश्चर्यचकित केले.अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ सध्या ट्विटरवर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत गाडीच्या इंजिनमध्ये एका मोठ्या अजगराचा व्हिडिओ समोर आला आहे.तसेच या व्हिडिओमध्ये एक शिक्षक आपल्या गाडीच्या इंजिनमधून एक प्रचंड मोठा साप बाहेर काढताना दिसत आहे.हा अजगर इंजिन मधून बाहेर काढणे खूप अवघड होते.जेव्हा शिक्षिकेला एकट्याने अजगर काढता आला नाही तेव्हा तिथे असलेल्या चौघांनी त्याला बाहेर काढण्यासाठी मदत केली. त्या महिलेला जेव्हा इंजिनमध्ये अजगर असल्याची माहिती मिळाली तेव्हा ती इंजिन तपासण्यासाठी गेली. इतका लांब व अवाढव्य अजगर पाहून त्या बाईला आश्चर्य वाटले.थायलंडमधील काही जणांना इंजिनमधून 13-फिट लांबीचा अजगर बाहेर काढला. या व्हायरल व्हिडिओमध्ये आपण हे पाहू शकता की, हा अजगर किती विशाल आणि भयानक आहे.

हा व्हिडिओ पोस्ट केल्याच्या तासाभरातच त्याला 3.1 हजार व्यूज मिळाले आहेत.अजगर गाडीच्या इंजिनमधून काढताना त्याला अजिबात दुखापत झाली नाही. तो सुरक्षितपणे काढल्यानंतर जंगलात सोडण्यात आले . हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक आश्चर्यचकित झाले असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया ही देत आहेत.